Petrol Pump Accident Video Viral : रस्ते अपघातात रोज शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. कधी स्वत:च्या चुकीने, तर कधी समोरच्या वाहनचालकाच्या चुकीने हे अपघात होतात. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, कधी ब्रेक फेल होतो, तर कधी अचानक गाडीच्या वेगामुळे, तर कधी निष्काळजीपणामुळे हे अपघात घडत असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका भीषण अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला कळेल की, निष्काळजीपणाने गाडी चालवण्याचे काय परिणाम भोगावे लागू शकतात.

व्हायरल व्हिडीओत एक कार पेट्रोल पंपावर साफसफाई करणाऱ्या एका वृद्ध महिलेला चिरडताना दिसतेय. हा अपघात इतका भयानक आहे की, पाहून तुमच्या काळजातही धडकी भरेल. हा अपघात तमिळनाडूतील एका पेट्रोल पंपावर घडल्याचे सांगितले जातेय. जो पंपावर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओत पाहू शकता की, एक वृद्ध महिला सफाई कर्मचारी पेट्रोल पंपाच्या परिसरात झाडू मारत कचरा गोळा करतेय. त्याच वेळी पांढऱ्या रंगाची ह्युंदाई क्रेटा कार इंधन भरून पेट्रोल पंपावरून निघत असताना समोर बसलेल्या त्या सफाई कर्मचाऱ्याला थेट उडवते आणि चिरडत पुढे निघून जाते.

https://twitter.com/Deadlykalesh/status/1947286343458971849

Petrol pump woman accident video
पेट्रोल पंपावर महिलेचा भीषण अपघात (फोटो – @Deadlykalesh /x)

कारचालकाला कदाचित ती सफाई कर्मचारी दिसली नसावी म्हणून त्याने गाडी थेट पुढे नेली, असे सांगितले जाते. पण, गाडीचे पुढचे चाक थेट महिलेच्या अंगावरून गेले. यावेळी पेट्रोल पंपाजवळच असलेला एका कर्मचारी धावत जाऊन ड्रायव्हरला गाडी थांबवण्यासाठी ओरडला. सुरुवातीला ड्रायव्हरला काय झाले ते समजले नाही; परंतु त्याची चूक लक्षात येताच त्याने ताबडतोब गाडी थांबवली. यावेळी पंपावरील इतर कर्मचारीदेखील धावत आले आणि त्यांनी अपघातग्रस्त महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या थरारक अपघाताचा व्हिडीओ @Deadlykalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी त्यावर कमेंट केली. लोक या अपघाताबद्दल संताप आणि दुःख दोन्ही व्यक्त करीत आहेत. एका युजरने लिहिले, “आश्चर्यकारक, त्यानं इतक्या मोठ्या महिलेला पाहिलं नाही?” दुसऱ्याने रागाने म्हटले, “अशा लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स कोण देते?” अनेकांनी ड्रायव्हरला, श्रीमंत बापाचे बिघडलेले मूल, असेही म्हटले. काहींनी असेही म्हटले की, जर ड्रायव्हरने थोडी काळजी घेतली असती, तर हा अपघात टाळता आला असता.