scorecardresearch

Premium

कानाजवळ मोबाईल, एका बाजूला पाय; फोनवर बोलण्याच्या नादात त्याने बाईकचा हॅंडलदेखील सोडला, थरारक Video व्हायरल

व्हिडीओतील व्यक्ती बाईकचा हॅंडल न पकडता भरधाव बाईकवरुन जाताना दिसत आहे.

shocking stunt video
व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Photo : Twitter)

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, जे पाहिल्यानंतर आपणाला हसू आवरण कठीण होतं, तर काही व्हिडिओ असे असतात जे पाहिल्यानंतर आपणाला आपल्याच डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण व्हिडीओत एक माणूस बाईकचा हॅंडल न पकडता मागच्या सीटवर एका बाजूला पाय सोडून भरधाव वेगाने बाईकवरुन जाताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ १५ सेकंदांचा आहे, परंतु तो पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण बाईवर बसलेला माणूस मागच्या सीटवर एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून बसल्याचं दिसत आहे. एवढंच नव्हे तर ते चक्क धावत्या बाईकवर मोबाईलवर बोलत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. आपणाला हे दृश्य पाहताना धोकादायक वाटत असलं तरी बाईकवरचा माणूस मात्र आरामात फोनवर बोलत बसल्याचं दिसत आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे यावेळी बाईकवर बसलेल्या व्यक्तीने बाईकचा हॅंडलदेखील पकडलेला नाही. स्वतःहून धावणारी बाईक बघून अनेकजण थक्क झाले आहेत.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त
The son told his mother a strange reason for not studying
अभ्यास न करण्यासाठी मुलानं आईला सांगितलं भन्नाट कारण; Video एकदा पाहाच

हेही पाहा- नाल्यातील पाणी घ्यायचा अन्…, नारळपाणी विक्रेत्याचं किळसवाणं कृत्य कॅमेऱ्यात कैद, संतापजनक Video व्हायरल

हेही पाहा- लग्न समारंभात शंख आणायला विसरले भटजी, ऐनवेळी केला भन्नाट जुगाड, व्हायरल Video पाहून पोट धरुन हसाल

अनोख्या पद्धतीने बाईक चालवणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडओ @DoctorAjayita नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. शिवाय तो नेटकऱ्यांनादेखील खूप आवडल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ १ लाख ७३ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी तो लाईक केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये “खूप महत्त्वाचा कॉल” असं लिहिण्यात आलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्याच्या गर्लफ्रेंडचा कॉल असावा असं म्हटलं आहे. तर काहींनी खूप जबरदस्त ड्रायव्हर असल्याच्या कमेंट केल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shocking bike stunt video of a person riding a bike by leaving the handle of the bike viral on social media jap

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×