Viral Video of Bus Accident: जगणं कधीच सुरक्षित नाही. कधी काय होईल सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे, जी पाहताच तुमचाही थरकाप येईल. काही सेकंदांत घडलेल्या या प्रसंगाने सर्वांचे श्वास जणू क्षणभरासाठी थांबले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या धक्कादायक व्हिडीओने लाखो लोकांना भयभीत केले आहे. प्रवाशांचे चेहरे, अचानक होणारी घटना आणि धक्‍क्यामुळे निर्माण होणारी गोंधळाची परिस्थिती पाहून प्रत्येक जण हतप्रभ झाला आहे. या घटनेचे रेकॉर्डिंग बसमधील डॅशकॅमने केली असून, जे पाहणाऱ्यांना थक्क करून टाकत आहे. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत, काहींनी आश्चर्य व्यक्त केले; तर काहींनी धोक्याची सूचना केली.

पण सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे या एका क्षणात काय घडले, ते पाहून तुम्हाला विश्वासच बसणार नाही. हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडीओ पाहावा लागेल; पण सावधगिरी बाळगा! दृश्य इतके धक्कादायक आहे की, पाहताना तुमचंही हृदय थोडं धडधडेल.

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसतंय की, एका बसमध्ये बसणारी महिला अचानक बसच्या बाहेर कोसळली. ही घटना इतकी भीषण आहे की, पाहताच मन थरथरून जातं.

व्हिडीओमध्ये दिसतंय की बस एका स्थानकावर थांबते आणि काही प्रवासी उतरू लागतात. त्या वेळी एक महिला मागच्या दारातून बसमध्ये चढते आणि समोरच्या सीटवर बसण्याच्या तयारीत असते; पण अचानक बस चालू होते आणि तिला जोरदार झटका बसतो. त्यामुळे महिला संतुलन गमावून थेट बसच्या बाहेर पडते. ती जोरात पडल्याचा आवाज आणि तिची किंचाळी व्हिडीओत स्पष्ट ऐकू येते.

अत्यंत धक्कादायक गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रसंगादरम्यान बसचालकाला महिला पडल्याचे लक्षातही येत नाही. बसचालक आधी काही प्रवाशांना उतरवतो; पण गेट पूर्ण बंद न करताच बस पुढे सुरू करतो. महिला पडली तरीही बस थांबत नाही. ती थेट पुढे जाते. या क्षणाचे रेकॉर्डिंग बसमधील डॅशकॅमने केले आहे. बसमध्ये डॅशकॅम हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण असते, जे ड्रायव्हिंगचा व्हिडीओ रेकॉर्ड करते. अपघात, सुरक्षा किंवा इतर घटनांच्या वेळी त्याचा पुरावा म्हणून वापर केला जातो. बसेसमधील सुरक्षा वाढवणे, कामकाज व्यवस्थापित करणे आणि ग्राहकांच्या सेवेतील सुधारणेसाठी डॅशकॅमचा वापर वाढत्या प्रमाणात होत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून लोक संतप्त झाले आहेत. अनेकांनी बसचालकाच्या बेफिकिरीवर टीका केली; तर काहींनी त्या महिलेनं स्वतः सतर्क राहायला हवं होतं, असं म्हटलं. काहींनी तर बस प्रवाशांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मात्र अद्याप ही गोष्ट स्पष्ट झाली नाही की, या घटनेत महिला गंभीर जखमी झाली की तिचा जीव वाचला.

या प्रकाराने प्रवाशांमध्ये एक भयाची लाट निर्माण केली आहे. बसमध्ये सावध न राहिल्यास किती धोकादायक परिणाम होऊ शकतात, हे पाहून अनेकांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर होताच लाखो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी आरोप केले; तर काहींनी भविष्यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले.

येथे पाहा व्हिडीओ

हा धक्कादायक प्रसंग आपल्याला लक्षात आणून देतो की, थोडयाशा बेफिकिरी किंवा निष्काळजीपणामुळे किती भीषण परिणाम होऊ शकतो. बसच्या एका झटक्यामुळे एक सामान्य प्रवास एका जीवघेण्या घटनेमध्ये बदलला.