lioness attack wild boar: जंगलाच्या जगात कोणता शिकारी आपल्या ताकदीने संपूर्ण खेळ कधी बदलेल हे कोणालाही माहिती नसते. हेच कारण आहे की जेव्हा जेव्हा जंगलाशी संबंधित कोणताही व्हिडीओ इंटरनेटवर येतो तेव्हा तो वापरकर्त्यांमध्ये लगेच व्हायरल होतो. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे, जिथे एक रानडुक्कर एका सिंहिणीसमोर आला. त्यानंतर असे काही घडले ज्याची कोणीही, कधीही अपेक्षा केली नव्हती. यामुळेच जंगलाचा हा व्हिडीओ इंटरनेटच्या जगात येताच व्हायरल झाला.

जंगल म्हटलं की तिथे नेहमीच शक्तिशाली प्राणी आपल्यापेक्षा दुर्बळ प्राण्यांना आपलं भक्ष्य बनवत असतात, त्यामुळे तिथे जेव्हा एखादी दुर्मीळ घटना घडते तेव्हा नेहमीच चर्चेचा विषय ठरते. अशाच एका दुर्मीळ क्षणाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सिंहीण जंगलातील एक अतिशय क्रूर शिकारी आहे, जिच्यापासून सुटका मिळवणे खूप कठीण आहे. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे. रानडुक्कर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किती प्रयत्न करतो ते यात दाखवण्यात आले आहे, पण शेवटी खेळ कसा संपतो ते जाणून घ्या..

नक्की काय घडलं?

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जंगलात शिकार करण्याची शैली दाखवली आहे. यामध्ये रानडुक्कर पहिल्यांदा सिंहिणीपासून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना, सिंहीण त्याचा पाठलाग करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, सिंहिणीला पाहताच रानडुक्कर जीव वाचवण्यासाठी पळत सुटतं, पण सिंहिणीनं जोरदार धावत पाठलाग करत त्या रानडुक्कराला पकडलं. रानडुक्कर स्वतःला वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो. इथे सिंहीण त्याला तिच्या जबड्याने पकडते आणि खाली पाडते, तर डुक्करही तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण अगदी क्षणातच सिंहीण त्याचा फडशा पाडते. हा हल्ला इतका जोरदार होता की रानडुकराचा जागीच मृत्यू होतो. सिंहीण तिच्या वेग आणि ताकदीने त्याला हरवते, जे पाहिल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटते. ही शिकार जवळच उभ्या असलेल्या पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपली आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

येथे पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Nature Is Metal (@natureismetal)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर natureismetal नावाच्या अकाउंटने शेअर केला आहे. ही बातमी लिहिपर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, “कोणतीही हुशारी सिंहिणीला हरवू शकत नाही.” तर दुसऱ्याने लिहिले की, “रानडुकराने आपल्या वेगाने सिंहिणीला हरवण्याचा प्रयत्न केला!” याशिवाय, या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असून जंगलातील ही अनोखी फायटिंग पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.