How Soap Is Made in Factory: जगात कदाचित एखाद-दुसराच माणूस असा असेल, ज्याने कधी साबण वापरलेला नसेल. हात धुण्यापासून ते अंघोळीपर्यंत रोजच्या आयुष्यात साबणाचा वापर होतो. त्यामुळेच जगभरात असंख्य मोठ्या–लहान कंपन्या साबण तयार करण्याच्या व्यवसायात गुंतलेल्या आहेत. पण तुम्हाला खरंच माहीत आहे का, साबण कसा बनवला जातो?
हात धुण्यापासून अंघोळीपर्यंत वापरला जाणारा साबण… पण तो कारखान्यात तयार होतो तरी कसा? एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमचा भ्रमनिरास होणारच! लाखो लोकांनी पाहिलेल्या या व्हिडीओवर प्रचंड खळबळ उडाली आहे. कारण- साबण बनवण्याची पद्धत पाहून अनेकांनी स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्यात साबण बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया दाखवली आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच पाहणाऱ्यांना शंका येते – “येथे नक्की साबण बनतोय की नूडल्स?” कारण- मशीनमधून बाहेर पडणारे लांबच लांब पट्टे अगदी नूडल्स किंवा कुरकुरेप्रमाणे दिसतात.
साबण तयार करण्याची अजब पद्धत
व्हिडीओमध्ये दिसते की साबण बनविण्याच्या प्रकियेत वापरण्यात येणाऱ्या एका विशिष्ट पदार्थाचे छोटे छोटे तुकडे मशीनमध्ये टाकले जातात आणि त्यातून नूडल्ससारखे लांबसर तुकडे तयार होतात. हे तुकडे नंतर दुसऱ्या मशीनमध्ये टाकले जातात. त्यानंतर त्यांचे पुन्हा लहान तुकडे करून, ते साच्यात टाकले जातात. साच्यातून बाहेर आल्यानंतर ते अगदी साबणासारखे दिसू लागतात. शेवटी या साबणाला पॅकिंग केले जाते आणि तो बाजारात विक्रीसाठी सज्ज होतो.
नेटकऱ्यांच्या तिखट प्रतिक्रिया
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर smartest.worker या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला तब्बल २० लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले असून, १९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी त्याला लाईक केलं आहे. मात्र, लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्स करीत मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
एका युजरनं लिहिलं – “हा साबण स्वच्छतेचं साधन नसून थेट व्हायरसचं घर आहे.” दुसऱ्यानं विचारलं – “कामगारांनी हातमोजे का घातलेले नाहीत?”, तर आणखी एका युजरनं– “सावधान! हा साबण वापरल्यानंतर हात पुन्हा धुवावे लागतील.”, असा मजेदार टोला मारला आहे. काहींनी तर थेट आरोप केला की, या साबणामुळे अंघोळ करताना त्वचेला खाज सुटू शकते.
येथे पाहा व्हिडीओ
लोक संतप्त
व्हिडीओ पाहून अनेकांनी आरोग्य आणि स्वच्छतेबाबत चिंता व्यक्त केली. अनेकांना ही प्रक्रिया पाहून धक्का बसला आणि साबण खरंच इतक्या अस्वच्छ पद्धतीने तयार होतो का, असा प्रश्न पडला. एकूणच, साबण तयार करण्याची ही व्हायरल क्लिप लोकांमध्ये उत्सुकता, संताप आणि चर्चा, असे विविध नकारात्मक सूर निर्माण करते आहे.