Anaconda Viral Video : वन्य प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी ते शिकारीचे असतात तर कधी एखाद्या गमतीदार प्रसंगाचे. पण, काही वेळा प्राण्यांचे असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहून खूप भीती वाटते. सध्या अतिशय भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडियावर अनेक असे व्हिडीओ व्हायरल होत असतात जे हैराण करणारे असतात. तुम्ही अ‍ॅनाकोंडा नेहमी सिनेमात पाहिला असेल. अ‍ॅनाकोंडाला जगातील सर्वात विशाल आणि खतरनाक साप मानला जातो. एनाकोंडा हा किती खतरनाक असतो हे काही वेगळं सांगायला नको. सापांच्या प्रजातीमधील सर्वात खतरनाक शिकारी म्हणून एनाकोंडा ओळखला जातो. इतर साप पक्षांची अंडी, उंदीर, बेडूक अगदी फार फार ससा किंवा हरणाची वगैरे शिकार करतात. पण एनाकोंडा पार वाघ सिंहांना सुद्धा जिवंत गिळण्याची क्षमता ठेवतो.

अशाच एका भल्यामोठ्या एनाकोंडाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अ‍ॅनाकोंडा हा जगातील सर्वात मोठ्या सापांपैकी एक आहे, जो त्याच्या भक्ष्याला विळख्यात गुदमरुन मारण्यासाठी ओळखला जातो. त्याचे स्नायू इतके मजबूत असतात की तो हत्तीसारखा कोणताही मोठा प्राणी सहज गिळू शकतो. हा साप शिकाऱ्याच्या शरीराला वेटोळे करुन त्याची श्वास घेण्याची शक्तीच संपवतो. त्यानंतर शिकार संपूर्ण गिळून टाकतो. ॲनाकोंडाच्या चार जाती आहेत. त्यात ग्रीन ॲनाकोंडा हा सर्वात मोठा आहे. तो आपले संपूर्ण जीवन पाण्यातच घालवतो. त्यांच्या नाकपुड्या आणि डोळे डोक्याच्या वरच्या बाजूला असतात. जेणेकरून ते पाण्याखाली असतानाही शिकार पाहू शकेल.

कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा साप अ‍ॅमेझॉनच्या जंगलात आढळला. पण व्हिडीओवरुन हा AI जनरेटेड व्हिडीओ आहे असं दिसतेय. म्हणजे, हा व्हिडीओ खरा नाही. एआय सॉफ्टवेअर्सच्या मदतीनं या सापाची निर्मिती करण्यात आली आहे. अ‍ॅनाकोंडा हे प्रामुख्यानं अ‍ॅमेझॉनच्या जंगलात सापडतात, कारण तिथलं वातावरण हे एनाकोंडासाठी पोषक आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ ७४७ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.