Monkye viral video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात काही व्हिडीओ पाहून हसू येतं तर काही व्हिडीओ पाहून डोळ्यांत पाणी येतं. मात्र काही व्हिडीओ असेही असतात जे विचार करायला भाग पाडतात. अशाच एका माकडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येतच राहतात आणि ते आलेही पाहिजेत. नाहीतर जगण्याला कारणच उरणार नाही. त्यामुळे, ही वेळ जर तुमच्या आयुष्यात अपयश घेऊन आली असेल, तर वाईट वाटून घेऊ नका, कारण अपयशातूनच यशाकडे जाणारा मार्ग दिसणार आहे. फक्त संयम ठेवा. योग्य वेळेची वाट बघा. यश एका रात्रीत मिळत नाही आणि मिळालेच, तर टिकत नाही.

प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. परंतु, जिथे प्रयत्न संपतात, तिथे देवावर आणि दैवावर भार टाकण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच उरत नाही. जो प्रयत्न करतो, त्याला परमेश्वर साथ देतो. म्हणून प्रयत्नांती परमेश्वर म्हटले आहे. कोणत्याही अवघड परिस्थितीत आपण प्रयत्नच केले नाहीत, ही खंत मनात राहता कामा नये. यासाठी आधी प्रयत्न करा, बाकी परमेश्वरावर सोपवा, जसे या हुशार माकडानं केले. त्यानंजर प्रयत्नच केले नसते तर तो हरला असता.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, उंचावर असलेल्या एका फळाच्या झाडावर माकड बसलं आहे. झाडावर असलेली फळ काढण्यासाठी माकडाची धडपड सुरु आहे. या झाडावरुन खाली पडलो तर थेट दरीत जाणार याची कल्पना असूनही माकडानं फळं तोडण्याचं धाडस केलं. फळांची फांदी लहान असल्यामुळे ती कधीही तुटण्याची शक्यता आहे, त्यामुळे माकड पुढे जाऊ शकत नाहीये. मात्र यावेळी माकडानं डोकं लावत ती फांदी जोरदार ताकदीन आपल्या बाजूला खेचत तोडली आणि फळं काढली. माकडाच्या या हुशारीचं कौतुक केलं जात आहे. हा व्हिडीओ प्रयत्नांती परमेश्वर याचं उत्तम उदाहरण आहे.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Vishwanath Khalnekar (@official_vishwa_96k)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ official_vishwa_96k नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या घटनेने हे सिद्ध केले आहे की कधीही हार मानू नये. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.