Anaconda Viral video: साप म्हणताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. आणि त्यात जर का एनाकोंडा प्रजातीचा साप असेल, तर मग काय विचारायलाच नको. कारण एनाकोंडा ही सापांची सर्वात मोठी प्रजाती आहे. एका फटक्यात तो मगरीची सुद्धा शिकार करू शकतो.

वन्य प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी ते शिकारीचे असतात तर कधी एखाद्या गमतीदार प्रसंगाचे. पण, काही वेळा प्राण्यांचे असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहून खूप भीती वाटते. सध्या अतिशय भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडियावर अनेक असे व्हिडीओ व्हायरल होत असतात जे हैराण करणारे असतात. तुम्ही अ‍ॅनाकोंडा नेहमी सिनेमात पाहिला असेल. अ‍ॅनाकोंडाला जगातील सर्वात विशाल आणि खतरनाक साप मानला जातो. एनाकोंडा हा किती खतरनाक असतो हे काही वेगळं सांगायला नको. सापांच्या प्रजातीमधील सर्वात खतरनाक शिकारी म्हणून एनाकोंडा ओळखला जातो. इतर साप पक्षांची अंडी, उंदीर, बेडूक अगदी फार फार ससा किंवा हरणाची वगैरे शिकार करतात. पण एनाकोंडा पार वाघ सिंहांना सुद्धा जिवंत गिळण्याची क्षमता ठेवतो.

अशाच एका भल्यामोठ्या एनाकोंडाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अ‍ॅनाकोंडा हा जगातील सर्वात मोठ्या सापांपैकी एक आहे, जो त्याच्या भक्ष्याला विळख्यात गुदमरुन मारण्यासाठी ओळखला जातो. त्याचे स्नायू इतके मजबूत असतात की तो हत्तीसारखा कोणत्याही प्राण्यावर तो सहज हल्ला करतो. हा साप शिकाऱ्याच्या शरीराला वेटोळे करुन त्याची श्वास घेण्याची शक्तीच संपवतो. त्यानंतर शिकार संपूर्ण गिळून टाकतो. ॲनाकोंडाच्या चार जाती आहेत. त्यात ग्रीन ॲनाकोंडा हा सर्वात मोठा आहे. तो आपले संपूर्ण जीवन पाण्यातच घालवतो. त्यांच्या नाकपुड्या आणि डोळे डोक्याच्या वरच्या बाजूला असतात. जेणेकरून ते पाण्याखाली असतानाही शिकार पाहू शकेल.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जंगलातल्या एक नदीत हा भलामोठा एनाकोंडा फिरत आहे. यावेळी हा महाकाय आपल्याला सहज संपवू शकतो याचा अंदाज असतानाही लोक व्हिडीओ काढत आहेत.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ sdmdiving नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.