Child Trapped in Electric Current: आजच्या काळात माणुसकी ही एक दुर्मीळ गोष्ट झाली आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, दुसऱ्यांसाठी उभे राहणारे लोक फार थोडेच उरलेत. मात्र, सोशल मीडियावर समोर आलेल्या एका थरारक व्हिडीओनं सगळ्यांना विचार करायला लावलं आहे. पावसाळ्यात करंट पसरलेल्या रस्त्यावर एक मूल जीवासाठी तडफडत होतं आणि सगळे फक्त बघ्याची भूमिका घेत उभे होते. अशा वेळी एका ‘काका’नं स्वतःचा जीव धोक्यात घालून जे केलं, ते पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आलं. रस्त्यावर करंट पसरलेला, भोवती घाबरलेली गर्दी आणि जमिनीवर पडलेला एक निरागस जीव… मृत्यू अगदी डोळ्यांसमोर उभा होता. अशा वेळी एक माणूस पुढे आला आणि पुढच्याच क्षणी जे घडलं, ते अविश्वसनीय होतं.
करंटने वेढलेला रस्ता आणि जमिनीवर पडलेला मासूम
पावसाळ्यात अनेकदा खांब पडणे किंवा विजेच्या तारा तुटणे ही नित्याची गोष्ट आहे. अशा वेळी जमिनीवर करंट पसरतो आणि क्षणात जीवघेणे प्रसंग घडतात. अगदी असाच प्रसंग घडला. एका रस्त्यावर विजेचा करंट पसरलेला असताना एक मूल त्याच्या विळख्यात सापडलं आणि क्षणार्धात जमिनीवर कोसळलं. भोवती लोक उभे होते; परंतु करंटमुळे कुणीही जवळ जायची हिंमत करत नव्हतं. त्या निष्पाप मुलाचे आक्रोश आणि अश्रू सर्वांनी पाहिले; पण मदतीला पुढे कुणीच आलं नाही…
‘त्या’ काकाची धाडसी एन्ट्री
मात्र, काही क्षणांतच गर्दीतून एक चाचा पुढे सरसावले. कुणी जवळ जायची हिंमत करीत नव्हतं; पण त्यांनी थेट मुलाकडे पावलं वळवली. पहिल्यांदा करंटचा धक्का बसल्यामुळे ते थोडं मागे हटले. पण, हार न मानता, त्यांनी आपल्या कपड्याचा वापर करून हुशारीनं मुलाला ओढून घेतलं आणि त्याचा जीव वाचवला. उपस्थित लोकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.
सोशल मीडियावर व्हायरल
हा हृदयस्पर्शी व्हिडीओ true.line__ या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. काही तासांतच लाखो लोकांनी तो पाहिला असून, कमेंट्सचा पाऊस पडतोय. एकानं लिहिलं – “या काकाला माझा दिल से सलाम!” तर दुसऱ्यानं म्हटलं– “माणुसकी ही जात-पात-धर्माच्या पलीकडे आहे आणि यानं ते सिद्ध केलं.”
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा
https://www.instagram.com/reel/DLNPJp7PSNR/?utm_source=ig_web_copy_link
खरी माणुसकी अजून जिवंत
जर त्या काकानं योग्य वेळी धाडस दाखवलं नसतं, तर कदाचित त्या मुलाचा मृत्यू निश्चित होता. त्यांच्या या कृतीनं जगाला पुन्हा एकदा दाखवून दिलं की, खरी माणुसकी अजून जिवंत आहे. फक्त तिची ओळख पटवणारे प्रसंग दुर्मीळ आहेत.