Viral video: सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपण अनेकदा पाहतो. काही व्हिडीओ पाहून आपण पोट धरुन हसतो तर काही व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी येतं. त्यातही काही व्हिडीओ असेही असतात जे पाहून धक्का बसतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. अशाच एका महिलेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
साप दिसताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. लोक भितीनं वाट मिळेल तिथे पळू लागतात. अन् त्यामध्ये जर का खूप साप असतील तर मग काय विचारायलाच नको. सापाच्या एका दंशानं सुद्धा माणसाचा मृत्यू होऊ शकतो. पण विचार करा जर चुकून तुम्ही एखाद्या सापांनी भरलेल्या विहिरीत पडलात, तर तुमची काय अवस्था होईल? होय, असाच प्रकार एका महिलेसोबत घडला.ही ४८ वर्षांची महिला जंगलात फिरत असताना चुकून एका विहिरीत पडली. ही विहीर सांपांनी भरलेली होती. आश्चर्य म्हणजे तब्बल ५४ तास ती त्या विहिरीत सापांशी झुंज देत राहिली. अखेर शेवटी रेस्क्यू टीमनं तिला बाहेर काढलं.
ही घटना घडली आहे फुजियान प्रांतातील क्वानझोउ याठिकाणी. साउथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP)च्या वृत्तानुसार, १३ सप्टेंबर रोजी ही महिला जंगलात फिरायला गेली होती. पण फिरता फिरता ती एका जुनाट विहिरीत पडली. बरेच तास झाले तरी ती घरी आली नाही, त्यामुळे कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर जिनजियांग रुईतोंग ब्लू स्काय इमर्जन्सी रेस्क्यू सेंटरच्या टीमनं जंगलात शोधमोहीम सुरू केली. पण सुरुवातीला ती सापडली नाही. शेवटी टीमनं थर्मल इमेजिंग ड्रोनच्या मदतीने तिचा ठावठिकाणा लावला आणि ती एका पडक्या विहिरीत आढळून आली. तिला तातडीने बाहेर काढण्यात आलं.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @EremNews नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. एका युजरने कमेंट करताना लिहिले. ‘हा तर चमत्कार.’कमेंट करताना दुसऱ्या युजरने लिहिले, ‘हे अविश्वसनीय आहे.’ आणखी एका युजरने कमेंट केली आहे की, ‘ज्याच्याकडे धैर्य असते तोच जिंकतो.’ दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘महिलेच्या धाडसाला सलाम.’