Shocking video: कल्पना करा तुम्ही बाथरूममध्ये गेलात आणि तिथे तुम्हाला एक मोठा काळा कोब्रा साप दिसला तर तुमची अवस्था कशी असेल. याचा अंदाज तुम्ही स्वतः लावू शकता. अशा गोष्टीच्या नुसत्या विचाराने माणूस हादरतो. पण ही घटना खरोखर एका तरुणासोबत घडली आहे. तो टॉयलेटला गेला असताना टॉयलेट सीटचं झाकण उघडताच त्यामधून चक्क विषारी साप बाहेर पडला. आणि तरुणाला पाहून त्यानं दंश करण्यासाठी आपला फणा काढला. त्यानंतर काय घडलं तुम्हीच पाहा. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.
कोटा शहरातील नयापुरा परिसरातील एमबीएस आणि जेके लोन हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या निवासी डॉक्टरांच्या पीजी हॉस्टेलमध्ये ही घटना घडली आहे. सापाला पाहताच उपस्थित डॉक्टर घाबरले आणि ते त्यांच्या खोलीतून बाहेर पडले. विषारी काळा कोब्रा टॉयलेट कमोडमधून बाथरूममध्ये घुसला होता.कोब्रा टॉयलेट पाईपमधून कमोडमध्ये घुसला आणि नंतर हॉस्टेलच्या खोलीत घुसला. घटनास्थळाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये टॉयलेट सीटवर साप दिसत आहे. हा साप टॉयलेटमध्ये लपून बसला होता. सुदैवानं त्यानं कोणालाही दंश केला नाही. साप दिसताच काही लोकांनी त्याच्यावर जेट स्प्रेनं पाणी मारून त्याला पळवण्याचा प्रयत्न केला होता. पण या कृतीमुळे साप बिथरला आणि अधिक आक्रमक झाला.
सकाळी शौचालय वापरण्यासाठी जाताना वसतिगृहाच्या खोलीत साप दिसल्याने निवासी डॉक्टर मुदित शर्मा घाबरले. त्यांनी सांगितले की साप तिथेच फणा पसरून बसला होता. त्यांनी लगेच इतरांना परिस्थितीची माहिती दिली.साप आढळल्यानंतर वसतिगृहातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
पाहा व्हिडीओ
काही दिवसांपासून असेच काही सापांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. या व्हायरल व्हिडीओमध्ये साप कधी गाडीच्या चाकात अडकलेला दिसतो, तर कधी बुटाच्या आत दिसतो. असे थरकाप उडविणारे व्हिडीओ पाहिल्यावर कोणाच्याही अंगावर सहजपणे काटा येतो.असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Khushi75758998 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेकडो नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.