Elephant Crushed Woman video viral: हत्तीला पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी मानलं जातं. हत्तींचं वजन हजारो किलोंमध्ये असतं. हा प्राणी आपल्या पायाखाली काहीही दाबून त्याचा विनाश करू शकतात. अनेकदा हा प्राणी माणसांसोबतही राहातो, मात्र शेवटी तो आहे जंगलीच. त्यामुळे हा प्राणी जंगलात राहिलेलंच अधिक चांगलं असतं. जंगलातून प्रवास करत असताना अनेक हिंस्र प्राण्यांचा सामना करावा लागतो. अशातच वाघ, सिंह, हत्तीसारखे प्राणी समोर दिसल्यावर अनेकांची पळता भुई झाल्याशिवाय राहत नाही. प्राण्यांच्या हल्ल्याचे व्हिडिओ अतिशय भयानक आणि थरकाप उडवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बोट राईड करायला गेलेल्या काही पर्यटकांवर पिसाळलेल्या हत्तीने भयंकर हल्ला केला आहे. अक्षरश: बोट पाण्यात उलटी करुन पायाखाली चिरडलं आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

बोत्सवानाच्या पाणथळ प्रदेशात एका हत्तीने सफारी टूर दरम्यान अमेरिकन आणि ब्रिटीश पर्यटकांसह काही पर्यटकांवर हल्ला केला. हत्तीन अक्षरश: त्यांच्या बोटी उलट्या केल्या ज्यामुळे एका महिलेला हत्तीच्या सोंडेने काही काळासाठी पाण्याखाली धरले. ही घटना २७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध वन्यजीव क्षेत्र असलेल्या ओकावांगो डेल्टाच्या पाण्यात घडली. यावेळी टूर गाईडने मोकोरोस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅनोंना घटनास्थळापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला तरीही, हत्तीने हल्ला केला. त्याच्या सोंडेचा वापर करून, हत्तीने दोन्ही बोटींना धडक दिली आणि पर्यटक पाण्यात कोसळले.एका महिलेला हत्तीने तुडवले आणि तिला सोंडेने थोड्या वेळासाठी पाण्याखाली धरले.यानंतर तो महाकाय हत्ती शांतपणे कळपात परतला आणि पिल्लांना घेऊन निघून गेला.

प्रत्यक्षदर्शी पर्यटकांनी सांगितले की, महिलेला हत्तीने आणखी काही सेकंद दाबून ठेवले असते किंवा तिच्या दातांचा वापर केला असता तर त्याचा परिणाम घातक झाला असता. त्यामुळे ही घटना वन्यजीव अभयारण्याच्या नियमांचे पालन करण्याची आणि अशाप्रकारे चूक न करण्याचा धडा देते.

पाहा व्हिडीओ

हिंस्र प्राण्यांचा मुक्तसंचार वाढला असून प्राणी माणसांवर हल्ला करत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ econewses नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.