Extramarital Affair Video: नवरा बायकोचं नातं हे प्रेमापेक्षा अधिक विश्वासाच्या आधारावर अवलंबून असतं. प्रेम सगळेच करतात पण जर त्या नात्यात विश्वास नसेल तर त्याला काहीच अर्थ उरत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून विवाहबाह्य संबंंधांमध्ये वाढ झाली असून लग्न झाल्यावरही लोक अफेअर करतात. त्या नात्यात असलेली पवित्रता, खरेपणा दूषित करतात. सध्या बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे लोकांचा दृष्टिकोनही बदलत चालला आहे.
नात्यात तिसरी व्यक्ती आली की दुरावा येतो. प्रत्येक नात्यात थोडी नाराजी, भांडणं ही होतंच असतात पण, त्यातही एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं असतं. पण अशात काही लोक दुसरा पर्याय शोधतात आणि लग्न झालं असूनही अफेअर करतात. सध्या असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात एका नवऱ्याने त्याच्या बायकोला एका पुरूषाबरोबर रंगेहाथ पकडलं आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊ या…
बायकोला बॉयफ्रेंडबरोबर पकडलं अन्… (Wife Cheated On Husband Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका नवऱ्याने आपल्या बायकोला दुसऱ्या पुरूषाबरोबर त्याच्याच घरात पकडले. बायकोला याचा जाब विचारताच बायको घाबरली. व्हिडीओमध्ये त्यांच्यात जो संवाद झाला तो पाहूया…
तो- आत कोण आहे
ती- कोण आहे, कोणही नाही
तो- आत कोणीतरी आहे आणि मला दिसतंय
असं म्हणून नवरा त्या पुरुषाला बाहेर यायला सांगतो. तो पुरुष बेडखाली अर्धनग्न अवस्थेत लपला असतो. त्याला बाहेर यायला सांगताच बायकोच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @sigmmaclub या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल १७.४ मिलियन व्ह्यूज आले आहेत. तसंच ”बायकेला शिकवण्यासाठी नवऱ्याने आईचे दागिने विकले आणि आता तिला दुसऱ्या माणसाबरोबर पकडले” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. दरम्यान ही घटना नेमकी कुठे घडलीय हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया (Shocking Video)
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “बायकोला नाही तर मुलींना शिकवा.”, तर दुसऱ्याने “कृपया ऑनलाइन जे काही दिसते त्यावर विश्वास ठेवू नका. आजकाल लोक व्ह्यूजसाठी आणि व्हायरल होण्यासाठी काहीही करत आहेत. ते स्क्रिप्टेड असू शकते.” अशी कमेंट केली. “आजकाल लग्न करणंच भीतीदायक आहे.” अशी कमेंट एकाने केली.