Viral video: सोशल मीडियावर तुम्ही अनेक धक्कादायक व्हिडीओ पाहिले असतील, जे पाहून तुम्हाला नक्कीच हसू आले असेल. वन्यजीवांबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होतात. जंगलात प्राण्यांना जगण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो. ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी. अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

हत्तीला पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी मानलं जातं. हत्तींचं वजन हजारो किलोंमध्ये असतं. हा प्राणी आपल्या पायाखाली काहीही दाबून त्याचा विनाश करू शकतात. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. अशाच एका हनी बॅजर प्राण्यानं जंगलातल्या विशाल प्राण्याला आस्मान दाखवलंय. इवल्याशा प्राण्यानं त्या महाकाय हत्तीला पळवून लावलं. हत्ती इतका घाबरला की वाट मिळेल तिथे पळत सुटला. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हत्ती माळरानावर त्याच्याच नादात फिरत आहे. पण फिरता फिरता तो चुकून हनी बॅजरच्या क्षेत्रात पाऊल टाकतो. परिणामी तो भडकतो आणि हत्तीवर धावून जातो. गंमत म्हणजे हा प्राणी दिसायला चिमुकला आहे, पण त्याच्याकडे वाघाचं काळीज आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण त्याला पाहून हत्ती सुद्धा घाबरतो आणि पळ काढतो.दरम्यान हत्तीनं त्याला लाथेन दोन-चार वेळा उडवलं सुद्धा, पण त्यानं काही हार मानली नाही. शेवटी हत्तीच शांतपणे निघून गेला.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @amalindasafaricollection या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या. एका युजरने म्हंटलंय की, “जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं.”