Domino’s pizza unhygienic video: दैनंदिन जीवनात जंक फूड खाण्याची क्रेझ प्रचंड वाढली आहे. आजकाल अनेकजण मोठ्या आवडीने पिझ्झा, बर्गरसारखे जंक फूड खात असतात. पण तुम्ही खाता ते पदार्थ स्वच्छ आहेत की नाही? याची काळजी घेणं खूप गरेजचं आहे. हो कारण सध्या डॉमिनोजमधला एक किळसवाणा व्हिडीओ समोर आला आहे. तो पाहिल्यानंतर तुम्हाला पिझ्झा खायचा का नाही? असा प्रश्न पडू शकतो.

जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला अनेक फूडी लोक मिळतील. लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला खूप आवडतात. खास करुन फास्ट फूड. निरनिराळ्या ठिकाणचे फास्ट फूड लोक आवडीनं चाखतात. कुठेही बाहेर गेल्यावर लोक हमखास पिझ्झा, बर्गर, नूडल्स मागवतात. मात्र हे चमचमीत वाटणारे पदार्थ कसे बनवले जातात पाहिलं तर पुन्हा त्यांना हात लावण्याचीही इच्छा होणार नाही. आपल्यापैकी अनेकजण नावाजलेल्या ब्रॅंडचे खाद्यपदार्थ डोळे झाकून खात असतात, पण हे खूप धोकादायक ठरु शकतं. सध्या डॉमिनोजमधला समोर आलेला व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही पुन्हा त्याला हातही लावणार नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, डॉमिनोजमध्ये गेल्यानंतर पिझ्झा ऑर्डर केला त्यानंतर त्याने जेव्हा बॉक्स उघडला तेव्हा त्याला पिझ्झाचं चीझ वळवळताना दिसलं. नीट बघितलं असता त्याला एक अळी दिसली. बारकाईने पाहीलं असता त्याला पिझ्झामध्ये बऱ्याच अळ्या असल्याचं दिसलं. त्याने ताबडबोत या प्रकाराचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. यापूर्वी अनेकदा खाद्यपदार्थांमध्ये किडे,अळ्या आढळून आल्या आहेत. चॉकलेटमध्ये, कोल्ड ड्रींकमध्ये तर अनेकदा अळ्या आढळल्याचे प्रकार घडले आहेत. अशाप्रकारे लोकांची फसवणूक करताना दिसत असून हा प्रकार अतिशय गंभीर आहे. या व्हिडीओमध्येही अशाप्रकारे दावा करत आहे.

पाहा व्हिडीओ

खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल

बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते, त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ prime_kuki नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरु शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “अशाप्रकारे लोकांची फसवणूक करणे चुकीचे आहे.” तर आणखी एकानं, “हे गंभीर असल्याचं म्हंटलंय”