Dangerous nature video viral: सध्या पावसाळी वातावरणामुळे अनेक ठिकाणांचे सौंदर्य बहरून आले आहे. पावसाळ्याच्या सौंदर्याने नटलेला निसर्ग जसा मन मोहवून टाकतो, तसाच तो काही वेळा जीवघेणा ठरू शकतो. हिरवाई, डोंगरदऱ्या, आणि वाहणारे झरे पाहून अनेकजण फिरायला बाहेर पडतात, पण या निसर्गाच्या कुशीत लपलेलं संकट कधी उघडं पडेल, सांगता येत नाही. असाच एक थरारक प्रकार नुकताच समोर आला आहे, ज्यात एका लहान मुलींचा जीव अक्षरशः काही इंचांनी वाचला. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या…
सध्या सोशल मीडियावर एक थरारक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे, जो पाहून कोणीही दचकून जाईल. एका निसर्गरम्य डोंगराळ परिसरात असलेल्या तलावामध्ये दोन मुली मस्तीत पोहत असतानाच, त्यांच्या अगदी शेजारी मोठे दगड कोसळताना दिसतात. हे दृश्य इतकं धक्कादायक आहे की पाहणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः शहारे येतात. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी काही सेंटीमीटरचा फरक भयानक संकटात बदलू शकला असता.
क्षणार्धात घडलेला जीवघेणा प्रसंग
व्हिडिओमध्ये दोन लहान मुली तलावामध्ये बेफिकिरीने डुबक्या मारत असतात. निसर्गाच्या सान्निध्यात आनंद लुटत असताना अचानक डोंगरावरून दोन प्रचंड मोठे खडे जोरात खाली झेपावतात. या दगडांची दिशा सरळ तलावाच्या दिशेने असते आणि ते थेट मुलींच्या अगदी जवळ पडतात. जर हे दगड त्यांच्या डोक्यावर किंवा शरीरावर आदळले असते, तर अपघात टळणं कठीणच होतं.
दुर्दैव थोडक्यात टळलं… पण पुढचं काय?
विशेष म्हणजे, जेव्हा हे सगळं घडतं, तेव्हा मुली पाण्याखाली असतात. त्यामुळे त्यांना या प्रसंगाची कोणतीही कल्पना नसते. व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसते की या घटनेतून त्या दोघी अक्षरशः नशिबाने वाचल्या. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देत ही घटना ‘किस्मत की बात’ असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी हे पालकांच्या आणि पर्यटकांच्या बेफिकिरीचं फलित असल्याचं म्हटलं आहे.
येथे पाहा व्हिडीओ
प्रश्न उभे करणारी घटना
या धक्कादायक घटनेनंतर अनेकांनी निसर्गरम्य ठिकाणी जाण्यापूर्वी योग्य खबरदारी घेण्याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. जर याकडे वेळेवर लक्ष दिलं नसतं, तर एक आनंददायक क्षण एका शोकांतिकेत बदलू शकला असता.
हा व्हिडीओ एक इशारा आहे, निसर्ग सुंदर असला तरी त्याच्या बदलत्या रूपाला कधीही कमी लेखू नका, कधी काय घडेल सांगता येत नाही.