Viral video: सध्या अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केल्याच्या घटना समोर येत आहेत, त्यामुळे पावसाळ्यात निघणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात नको तिकडे भलतेच साहस करतानाही दिसतात. पण, असे साहस काही वेळा चांगलेच जीवावर बेतते. अशा घटना पाहता वारंवार सांगितले जाते की, पाण्याशी कधी खेळू नका. तरीही काही लोक जीवाची पर्वा न करता, धाडस करताना दिसतात. कधी कधी विचार न करता घाई-घाईत घेतलेला निर्णय नंतर पश्चाताप करायला भाग पाडतो. काही व्यक्तींमध्ये जरा जास्तच उत्साह असतो. याच उत्साहाला उधाण आलं की उत्साह कधी अनाठायी धाडसामध्ये बदलून जातो ते कळतही नाही.

कधी कधी काही धाडसी प्रयोग यशस्वी होतात. पण हेच प्रयोग अंगलट येऊन अगदी जीव जाईपर्यंतची अनेक उदाहरणे आपण आपल्या आजुबाजुला बघतच असतो. दररोज जे काही अपघात होतात त्यातले २० टक्के अपघात तरी विनाकरण काहीतरी अतिधाडस केल्याने हतात. आता हेच बघा ना एका तरुणाला पुराच्या पाण्यात बाईक घेऊन जाणं महागात पडलं. मित्र सांगत होते मात्र तरीही त्यानं ऐकलं नाही अन् पुढे काय झालं तुम्हीच पाहा..याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

ही घटना लडाखमधील पॅंगोंग सरोवराजवळ घडली आहे. लडाख हे बाईक रायडर्सचं आवडतं ठिकाण आहे. कारण या ठिकाणी रायडिंग करताना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बाईकर्सचा एक ग्रुप रायडिंग करत असताना मध्ये एक छोटी नदी लागली. पण हवामानातील बदलांमुळे या नदीचं पाणी हळूहळू वाढत होतं. दरम्यान, ग्रुपमधील सर्व बाईकर्सनी कशीबशी नदी ओलांडली. पण एक रायडर मात्र मागे राहिला. तो नदीत उतरेपर्यंत पाणी बऱ्यापैकी वाढलं होतं. त्यामुळे मित्रांनी त्याला पाण्यात न शिरण्याचा सल्ला दिला. पण तो काही ऐकायला तयार नव्हता. तो स्टंटबाजी करत पाण्यातून रायडिंग करायला गेला अन् तोपर्यंत पाणी वाढलं होतं. त्यामुळे नदीमध्ये बाईक नेताच तो अक्षरश: वाहून गेला

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ frontpageindian नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.