Shocking video: साप हा अत्यंत खतरनाक जीवांपैकी एक म्हणून ओळखला जातो. काही साप तर इतके खतरनाक असतात की त्यांच्या एका दंशानं सुद्धा माणसाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे बहुतांशी लोक नुसतं सापाचं नाव काढलं तरी भितीनं थरथर कापतात. पण विचार करा, हाच साप जर अचानक तुमच्या समोर आला तर तुमची काय अवस्था होईल? होय, असाच काहीसा प्रकार घडला आहे. एका घराच्या बाथरूममध्ये तब्बल ७० पेक्षा जास्त जिवंत साप सापडल्याची घटना घडली आहे.याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
ही घटना उत्तर प्रदेशातील महाराजगंजमधून समोर आली आहे. येथील सोनौली कोतवाली परिसरातील लोकांना एका नव्याने बांधलेल्या घराच्या शौचालयाच्या टाकीत मोठ्या संख्येने विषारी साप दिसले तेव्हा ते थक्क झाले. त्यांनी ताबडतोब वन विभागाला ही विचित्र घटना कळवली. झालं असं की एका व्यक्तीनं नव्यानं घर बांधले होते. यावेळी जेव्हा घरातील शौचालयाच्या टाकीचे झाकण स्वच्छ करण्याच्या उद्देशाने उचलले गेले तेव्हा लोकांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. बाथरुमच्या टाकीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात साप बघून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.
त्या टाकीत मोठ्या संख्येने विषारी सापांनी तळ ठोकला होता. यावेळी ते पाण्यात वेगाने पोहताना दिसले. हे दृश्य पाहून शेजाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यांनी वनविभागाला कळवले पण वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले नाही.अहवालानुसार, जेव्हा वन विभाग पोहोचले नाही, तेव्हा गावातील एका तरुणाने धाडस दाखवले आणि शौचालयाच्या टाकीत प्रवेश केला आणि सापांना बाहेर काढले. हरदीदली बरखा टोला येथील रहिवासी इस्लाम उर्फ नाई खान याने धाडस दाखवले आणि मच्छरदाणी घेऊन टाकीत प्रवेश केला. त्याने मच्छरदाणीच्या मदतीने सापांना काढून टाकले.यावेळी, तिथे उपस्थित असलेले लोक त्याच्या धाडसाचे कौतुक करू लागले. लोकांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आणि फोटो काढले जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यादरम्यान, सोनौली पोलिस ठाण्याचे प्रभारी अजित प्रताप सिंह यांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.
पाहा व्हिडीओ
पावसाळा सुरु आहे आणि त्यामुळे हे प्रकार होणारच. त्यातल्या त्यात गावाकडं घराच्या आजूबाजुला हे वाढलंय. त्यात मग पुन्हा दोन दोन दिवस पावसाची रिपरिप. कधी कधी मुसळधार. अशा ह्या पाऊसपाण्यामुळे सापासारखी जनावरं सैरभैर झाली नाही तर नवलच. कोरड्या जागेच्या शोधात ह्या सापांनी घरात घुसखोरी केलीय आणि नेमकं तेच आता धोकादायक झाल्याचं दिसतंय.
आता युझर्सनेही आपले घर तपासण्यास सुरुवात केली आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.