Shocking Video: आजकाल प्रत्येकाच्या घरी डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन येत असतात. अगदी लहान मोठ्या गोष्टींसाठी आपण ऑनलाईन ऑर्डर्स करतो. त्या वेळेत पोहोचाव्यात यासाठी डिलिव्हरी बॉयदेखील तितकीच मेहनत घेत असतात. पण अनेकदा काही डिलिव्हरी बॉय आपली हद्दच पार करतात.
सोशल मीडियावर अशा डिलिव्हरी बॉयच्या विकृत कृतींचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यात कधी कोणी दरवाजाबाहेरच्या चपला लंपास केल्याचं दिसून आलंय, तर कोणत्या डिलिव्हरी बॉयने अश्लील कृत्य केल्याचं समोर आलंय.
आजकाल कोण काय करेल याचा काही नेम नाही. सध्या डिलिव्हरी बॉयचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, जो पाहून तुमचाही राग अनावर होईल. या व्हिडीओमध्ये एका डिलिव्हरी बॉयने एका बिल्डिंगमधील लिफ्टमध्ये चक्क लघवी केली आहे. नेमकं काय घडलंय, ते जाणून घेऊ या…
व्हायरल व्हिडीओ (Delivery Boy Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुमचाही राग अनावर होईल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक डिलीव्हरी बॉय डिलीव्हरी देण्यासाठी एका बिल्डिंगमध्ये जातो. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी तो लिफ्टचा वापर करतो. लिफ्टमधून जात असताना तो सीसीटीव्ही कॅमेरात बघतो आणि लिफ्टमध्येच लघवी करतो. त्याचं हे घाणेर्ड कृत्य लिफ्टच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकलं नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @anuj_bansa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल २. ८ मिलियन व्ह्युज आले आहेत. तसंच “इमारतीच्या लिफ्टमध्ये ब्लिंकिटवाला लघवी करत आहे” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “ब्लिंकिटची चांगलीच ब्रॅंडिंग झाली आहे” तर दुसऱ्याने “याला खूप मारलं पाहिजे” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “कंपनी त्याच्यावर काही कारवाई करणार आहे का? नाहीतर तुम्हाला कंपनी बंद करावी लागेल?”