Viral video: सध्याच्या काळामध्ये नेमकं माणूस कोण आणि प्राणी कोण असा प्रश्न विचारावासा वाटावा अशा घटना समोर येत आहेत मानवाचे प्राण्यांवर एकापेक्षा एक गंभीर असे अत्याचार समोर येत आहेत. अशातच एक हृदय पिळवटून टाकणारी प्राण्यांवरील क्रूरतेची बातमी समोर आली आहे. एका तरुणानं कुत्र्याला लिफ्टमध्ये अतिशय अमाानुषपणे मारहाण केल्याच समोर आलं आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

माणूस असो वा प्राणी, दोघांनाही वेदना होतात. अशा परिस्थितीत लोक प्राणी पाळतातच पण त्यांच्यावर अत्याचारही करतात. तुम्ही काही लोक पाहिले असतील जे त्यांच्या पाळीव प्राण्यांवर त्यांच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतात. ते त्यांच्या कुटुंबाचा एक भाग असल्यासारखे वागतात. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अगदी याउलट पाहायला मिळालं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, यामध्ये एक व्यक्ती कुत्र्याला किती अमानुषतेने मारत असल्याचं दिसतं आहे. यादरम्यान तो एकापाठोपाठ एक अनेक वेळा त्याच्या कुत्र्यावर हल्ला करतो. त्या माणसाच्या हातात एक मजबूत रॉड आहे ज्याने तो कुत्र्याला जोरात मारताना दिसत आहे. यावेळी कुत्रा वेदनेने ओरडतो, पण मालकाला त्याची दया येत नाही आणि पुन्हा पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर हल्ला करत राहतो. यानंतर लिफ्ट उघडते आणि ती व्यक्ती आपल्या कुत्र्यासह तिथून निघून जाते.

how to deal with loneliness and how to help yourself
‘एका’ मनात होती..!: माझीच मदत मला!
Chhatrapati Sambhajinagar Demolition Video Mother Carrying Baby on Lap
डोळ्यासमोर घर उद्ध्वस्त होताना बाळाला मांडीवर घेऊन आईचा आक्रोश; अयोध्या नव्हे महाराष्ट्रातच झाली होती कारवाई, पाहा सत्य
flesh eating bacteria in japan
जपानमध्ये मांस खाणार्‍या जिवाणूचा उद्रेक, ४८ तासांत माणसाचा मृत्यू; हे जीवाणू जगभरात थैमान घालणार?
epf death claim if account person dies How to withdraw PF amount after death pf withdrawal form 20 submission documents needed
एखाद्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पीएफ खात्यातून पैसे कोणाला मिळतात? काढण्याची प्रक्रिया काय आहे? घ्या जाणून….
Moon Astrology chandrama in kundali
Moon Astrology: मूड स्विंग्समुळे तुम्ही वैतागला आहात का? चंद्राच्या प्रभावामुळे बिघडते- सुधारते व्यक्तीचे वर्तन
Loksabha election 2024 BJP loss map analysis of BJP performance
भाजपाने कुठे गमावलं, कुठे कमावलं? जाणून घ्या निकालाचा गोषवारा
What is gaslighting in a relationship
समुपदेशन : तुम्ही आहात विचारांचे बळी?
loksatta analysis methods for the quantification of evaporation from lakes
विश्लेषण : जलाशयांतील पाण्याचे बाष्पीभवन रोखायचे कसे?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरग्राम येथील सेक्टर ५४ मधील ऑर्किड गार्डन्समध्ये घडली आहे. हे संपुर्ण क्रुर कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने हे फुटेज व्हायरल होत आहे. लिफ्टमध्ये गोल्डन रिट्रीव्हर कुत्रा आणि त्यासोबत एक व्यक्ती आहे. जो त्याला खाली फिरवण्यासाठी घेऊन जातो. यावेळी त्याने कुत्र्याच्या नाकावर फोल्डिंग लिटर स्कूपने मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो त्याला सतत डोक्यावर चापट मारतो. ही घटना ९ मे रोजी घडली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: शेवटी तोही माणूसच आहे! भर रस्त्यात बायकोची नवऱ्याला निर्दयी मारहाण; तो ओरडत राहिला पण शेवटी…

@TheViditsharma नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ६२ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संतापलेल्या नेटकऱ्यांनी केली आहे. “जर तुमच्याकडे एखाद्या प्राण्याची काळजी घेण्यासाठी वेळ नसेल, तर त्याला घेऊ नका,” असे एका वापरकर्त्याने सांगितले. काहींनी या व्हिडिओ पोस्ट करत गुरुग्राम पोलिसांना टॅग केले आहे. प्राण्यांना क्रुरपणे मारहाण करणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.