Shocking Video Viral: गेल्या कित्येक वर्षांपासून गंभीर आजारांचं प्रमाण जरा जास्तच वाढलंय. अगदी लहानग्यांपासून- मोठ्यांपर्यंत सगळ्यांना गंभीर आजार होतात. यात कधी कुठे काय होईल याचादेखील नेम नसतो. ठणठणीत असलेल्या माणसालादेखील अचानक गंभीर आजार जडतो. काही लोक या आजाराशी लढून बाहेर येतात तर काहीजण यात लोकं आपला जीवही गमावतात.
वाईट वेळ कधी सांगून येत नाही. आजकाल प्रत्येक मिनिटाला कोणाला ना कोणाला आपला जीव गमवावा लागतो. अनावधानाने घडलेली एक चूक माणसाचं आयुष्य धोक्यात टाकू शकते. सध्या अशीच एक धक्कादायक घटना एका ठिकाणी घडली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत जेवताना बोलत असताना एका माणसाबरोबर जे काही घडलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल…
धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका ऑफिसमध्ये एक माणूस त्याच्या खुर्चीवर बसून मित्रांशी हसत खेळत बोलताना दिसतोय. यादरम्यान, तो काहीतरी खातानादेखील दिसतोय. पण बोलता बोलता अचानक धडधाकट दिसणारा हा माणूस आपली शुद्ध हरपतो आणि खुर्चीवरच आपलं अंग टाकतो. त्याला असं पाहून त्याच्या मित्रांना धक्का बसतो. त्याच्या आजूबाजूला असणारे सगळेजण त्याच्या मदतीला धावून येतात. त्याच्या पाठीवर जोरजोरात थोपटत त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या माणसाचा जीव वाचवण्यात त्यांना यश येतं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @pratapchitra या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “मित्रांनो हा जागरूकतेसाठी व्हिडिओ आहे, जेवताना आणि पाणी पिताना बोलू नका…!” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १४ लाखांपेक्षा जास्त व्हयुज आले आहेत. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली आहे, हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “म्हणूनच आपली आजी किंवा आई नेहमी सांगतात असते जेवताना बोलू नये” तर दुसऱ्याने “पुनर्जन्म” अशी कमेंट केली. तर एकाने “बापरे, त्याच्या मित्रांनी वेळेवर मदत केली म्हणून तो वाचला” अशी कमेंट केली.