Shocking Video: गुरुग्राममध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेत एका मॉडेलनं असा आरोप केला की, राजीव चौक येथे ती कॅबची वाट पाहत असताना, तिच्यासोबत दिवसाढवळ्या अश्लील कृत्य झालं.
तिने सांगितलं की, ती जिथे उभी होती तिथेच जवळ एक तरुण उभा होता, त्याने आपली पँट खाली करत अश्लील वर्तन केलं. त्या मॉडेलनं हे सगळं मोबाईलमध्ये शूट केलं आणि नंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून संपूर्ण घटना सांगितली आणि पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी केली.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video Woman Harassment)
FPJच्या वृत्तानुसार ही महिला नुकतीच जयपूरहून परतली होती. तिने सांगितलं की, ही घटना सकाळी साधारण ११ वाजता घडली, जेव्हा ती तिच्या कॅबची वाट पाहात होती.
“तो सतत माझ्याकडे बघत होता आणि मग मला लक्षात आलं की त्याची पँटची चेन उघडी आहे. तो थेट माझ्याकडे बघत होता आणि समोरच अश्लील कृत्य करू लागला,” असे तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितलं.
त्या क्षणी आपण किती असहाय्य वाटत होतो हे सांगताना तिने पुढे सांगितलं, “सुरुवातीला मी शॉक झाले, मी ना काही रेकॉर्ड केलं, ना त्याला मारलं. लोक म्हणतात की ओरडायला हवं होतं, पण त्यांना समजत नाही की अशा वेळी एखाद्या मुलीच्या मनात काय चालू असतं.”
तिने सांगितलं की, तिला महिला हेल्पलाइन किंवा पोलिस कंट्रोल रूमशी संपर्क साधायला खूप त्रास झाला. शेवटी तिला इंटरनेटवरून जवळच्या पोलिस ठाण्याचा नंबर मिळाला. मात्र, तिला सांगितलं गेलं की व्हिडीओतल्या व्यक्तीविरोधात तक्रार देण्यासाठी तिला स्वतः पोलिस ठाण्यामध्ये येऊन लेखी तक्रार द्यावी लागेल.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @isonisinghh या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला ७५ हजारापेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप कमी वेळातच वायरल झाला, कारण संबंधित महिलेला ३५,००० पेक्षा जास्त लोक फॉलो करतात. अनेक यूजर्सनी कमेंटमध्ये गुरुग्राम पोलिस आणि हरियाणा सरकारला टॅग केलं, त्यामुळे पोलिसांनी लक्ष दिलं.
आता सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 75(2) आणि 78 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस प्रवक्ते एएसआय संदीप यांनी एफआयआरची पुष्टी केली आणि सांगितलं की आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. “तपासात जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल,” असं त्यांनी News18 ला दिलेल्या माहितीत सांगितलं.