Shocking Video: बापाचं आणि त्याच्या लेकरांचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्याप्रमाणे आपल्या लेकराला जपणारा बाप अनेकदा त्याचं संकट स्वत:वर घेतो. लेकाच्या जन्मापासून ते मूल मोठं होईपर्यंत बाप आपल्या मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो, त्यांच रक्षण करतो. कठीण प्रसंगी तो आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो.

एवढंच नाही तर आपल्या लेकराला कुठे खरचटलं तरी त्याचा जीव वर-खाली होतो. पण याची जाणीव फक्त काहीच लेकरांना असते. हल्ली मुलं आपला राग आपल्या आईवडिलांवर काढू लागले आहेत. एवढंच नाही तर आईबापावर हातदेखील उगारू लागले आहेत. ज्यांनी आपल्याला या जगात आणलं, लहानाचं मोठं केलं, आपले सगळे हट्ट, लाड पुरवले त्यांनाच ही मुलं मोठी झाल्यावर मारहाण करतात.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक माणूस आपल्या वयोवृद्ध वडिलांबरोबर काय करतोय पाहा…

व्हायरल व्हिडीओ (Son Beats Father Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एका मुलाने हद्दच पार केली आहे. व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक माणूस आपल्या वयोवृद्ध वडिलांना भर रस्त्यात मारहाण करत आहे. सुरूवातीला तो त्यांना काठीने मारहाण करताना दिसतोय. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडलीय, हे अद्याप कळू शकले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @rahulgudiya_200 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “बाप जन्मदाता असतो, बाप कितीही वाईट असला तरी मुलाचं हे कर्तव्य असतं की तो बापाचा आदर करेल” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १ लाखापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “किती निर्लज्ज माणूस आहे तो”, तर दुसऱ्याने “जर असा मुलगा असेल तर नसलेलाच बरा. जर असं कोण करत असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे.” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “जे आजूबाजूला लोक उभे आहेत. ते फक्त तमाशा बघतायत, मदत करायला कोणीच जात नाही आहे.” तर एकाने “मुलगा म्हणून हरलास पण कर्म फिरुन येणार” अशी कमेंट केली.