Shocking Video: ऑफिस म्हटलं की कामाचं प्रेशर, डेडलाईन्स, टारगेट्स, मीटिंग्स याच गोष्टी डोळ्यांसमोर येतात. प्रत्येकाचं कामाचं स्वरूप वेगळं असतं. त्यानुसार प्रत्येक जण मेहनतदेखील करत असतो. पण काही लोक कामाच्या नावाखाली नुसता वेळ वाया घालवतात. काम वेळेत पूर्ण करत नाहीत आणि कामचुकारपणा करतात.
सध्या अशीच घटना एका ठिकाणी घडलीय ज्याचा व्हिडीओ सोशल मडियावर व्हायरल होतोय, या व्हिडीओत एक तरुणी ऑफिसमध्ये काम करायचं सोडून काय करतेय पाहा…
व्हायरल व्हिडीओ (Office Viral Video)
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात एक तरुणी ऑफिसच्या वेळेत रील्स बघतेय आणि वेळ वाया घालवतेय. तरुणीचा हा टाईमपास पाहून वरिष्ठ अधिकाऱ्याने तिला फक्त कामावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं, पण त्यावर ती चिडली आणि त्याला धमकी दिली. तिने त्यांना इतकंही म्हटलं की, “मी तुला जेलमध्ये टाकीन, काम तुमचं आहे. पोलिसांना कॉल करू, आता पोलीस येतील आणि तुम्हाला घेऊन जातील, सगळं म्हातारपण जेलमध्ये जाईल.” या घटनेमुळे ऑफिसमध्ये शिस्त, अधिकारांचा गैरवापर आणि खोट्या आरोपांचा वापर यासारख्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त केली जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @indians या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल २.७ मिलियन व्ह्युज आले आहेत. तसंच ‘कामावर रील पाहणाऱ्या महिलेला कामावर फोकस करायला सांगितल्यानंतर तिने वरिष्ठ अधिकाऱ्याला खोट्या केसची धमकी दिली’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडलीय, हे अद्याप कळू शकलं नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी या व्हिडीओवर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले, “हिला नोकरीवरून काढलं की नाही” दुसऱ्याने, “हिच्यावर केस झाली की नाही”, अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, ”अशा महिलांमुळे बाकी महिलांचंही नाव खराब होतं.” तर एकाने ”हिची नोकरी आता गेलीच समजा” अशी कमेंट केली.