Viral video: भटक्या कुत्र्यांचा त्रास हा काही नवीन नाही. अनेक शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटनांचे व्हिडीओ समोर येत असतात. गेल्या काही महिन्यांपासून देशात कुत्र्यांची दहशत वाढतच चालली आहे. सातत्याने कुत्र्यांच्या हल्ल्याच्या बातम्या कोणत्या ना कोणत्या शहरातून येत असतात. भटक्या कुत्र्यांचे हल्ले अनेकदा जीवघेणेही ठरले आहेत. दरम्यान आता पाळीव कुत्रेही कधी आक्रमक होतील ते सांगता येत नाही. अशाच एका झोपलेल्या कुत्र्याच्या जवळ जाणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे.पाळीव कुत्र्यानं महिलेवर जीवघेणा हल्ला करत तिच्या तोंडाचाच लचका तोडला आहे. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला झोपलेल्या कुत्र्‍याच्या जवळ जाते आणि त्याचे लाड करते मात्र महिला तोंडाजवळ जाते आणि तेवढ्यात तो कुत्रा थेट तोंडावर हल्ला करतो. तो अक्षरश: महिलेच्या तोंडाचा लचका तोडण्याचा प्रयत्न करतो. यावेळी ही महिला विरोध करते आणि कशीबशी कुत्र्याच्या तावडून सुटते. यावेळी ती प्रचंड घाबरलेली दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

पाहा व्हिडीओ

कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतं आहे. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. तसेच, सकाळ-संध्याकाळी फिरण्यासाठी बाहेर आणलेल्या पाळीव कुत्र्यांचाही लोकांना त्रास होतो. गाडीवरून जाणाऱ्यांचा पाठलाग असो, किंवा रस्त्यावरून जात असाल तरीही भटके कुत्रे हे टोळीने हल्ला करत आहे. शांतता असेल आणि एखादी व्यक्ती किंवा लहान मुलं एकटी असली की कुत्रे त्यांचेच राज्य असल्याप्रमाणे हल्ला करतात. यात आजवर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. तर, काही लहान मुलांनी जीवही गमावलेला आहे. कुत्र्यांचे माणसांवर हल्ला चढवण्याचे हे प्रमाण जास्त वाढत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ samacharplusofficial नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही संताप व्यक्त करत प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “प्राण्यांच्या इतक्या जवळ जाणं धोकादायक आहे” तर आणखी एकानं, भयंकर प्रकार म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.