Viral video: सिंहाला आपण जंगलाचा राजा म्हणतो. ज्याला पाहून किंबहुना त्याची फक्त डरकाळी ऐकून संपूर्ण जंगलातील सर्व प्राणी कसे थरथर कापतात, हे तुम्ही कधीतरी ऐकलंच असेल. जंगलातील हिंस्र प्राणी रहिवासी भागात शिरल्याच्या अनेक घटना घडतात. बिबट्या, वाघ, हत्ती, अस्वल…असे विविध प्राणी अनेकदा अन्न-पाण्याच्या शोधात रहिवासी भागात येतात. तुम्हीही अनेकदा अशा बातम्या ऐकल्या असतील. पण, तुम्ही कधी गावात सिंह शिरल्याची बातमी ऐकली आहे का? आपण प्राण्यांना समोरासमोर लढताना, भिडताना पाहिले असेल परंतू आताच्या व्हिडिओत मात्र एक वयोवृद्ध आज्जीच जंगलाचा राजा म्हणजेच सिंहाशी लढताना दिसून आली. ज्याला पाहताच लोक चार हात लांब पळून जातात अशा जंगलाच्या राजाला काठीने मारण्यासाठी आज्जीने धाव घेतली आणि मग जे घडलं ते तुम्हीच पाहा..

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यात एक ट्रक आणि काही लोक घाबरुन रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे दिसून येते. खरंतर ते सिंहाच्या भितीने घाबरुन उभे असतात. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला झाडीत सिंह लपलेला असतो. भितीचे वातावरण सुरु असतानाच या दृश्यात एक नवीन मनोरंजक ट्वीस्ट येतो. काहीच वेळात एक आज्जी रागातच काठी घेऊन सिंहाला मारायला जाते. ती निर्भयपणे काठीने सिंहाला मारण्याचा प्रयत्न करते हे पाहून लोक आश्चर्यचकित होतात. विशेष म्हणजे, जंगलाचा राजा म्हणून ओळखला जाणारा सिंहही आज्जीच्या हल्ल्याला घाबरतो आणि दुसऱ्याच क्षणी झाडीत पळून जातो. रस्त्यावर उभे असलेले लोकही हे पाहून चकीत होऊन जातात. हे इतके अविश्वसनीय आहे की पाहून सर्वजन थक्क झाले.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ multiversematrix नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्याच आला आहे, तो वेगाने व्हायरल होत असून लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एकानं म्हंटलंय, “वय नाही भावा हिम्मत लागते” तर आणखी एकानं, आजीला हलक्यात घेऊ नका आजीनं अनेक पावसाळे पाहिले आहेत.