Shocking video: आजही आपल्या देशात अनेक ठिकाणी विवाहित महिला आणि मुलींचा हुंड्यासाठी छळ होतो. त्यांना शारीरीक व मानसिक त्रास दिला जातो. या गोष्टींचा पीडितांना त्रास तर होतोच शिवाय त्यांच्या माहेरच्या लोकांना देखील याचा मनस्ताप सहन करावा लागतो.भारतीय घरांमध्ये महिलांचा शारीरिक आणि मानसिक छळ काही नवीन नाही. पण बहुतांश महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसल्यामुळेच हा हिंसाचार सहन करतात. अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तर तिला घर सोडावे लागेल, मग तिचा व मुलांचा उदरनिर्वाह कसा होईल, असे त्यांना वाटते. या विचारसरणीमुळे ती आयुष्यभर स्वत:वर झालेला अन्याय सहन करत राहते. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर येत आहे ज्यामध्ये एका मुलीचा सासरी छळ होत असल्यानं तिची काय अवस्था झालीय ते पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी व्हिडीओमध्ये मोठ मोठ्यानं ओरडत आहे. आज मला काही झालं तर माझी सासू यासगळ्याला जबाबदार असेल असं ती म्हणत आहे. पुढे मी फुकटचं खाते का, मी वेडी आहे का असं वारंवार ती बोलत आहे. तिला मानसीकरित्या किती त्रास होतोय हे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. यावरुन मुलींनी स्वत:च्या पायावर उभं राहणं किती गरजेचं आहे हे लक्षात येतंय.

ज्या स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असतात, त्यांना कुटुंबात अधिक सन्मान मिळतो. हे खरे आहे की गृहिणीचे काम अधिक कठीण असते आणि ती २४/७ काम करण्यास तयार असते. पण तरीही कुटुंबातील लोक त्याच्या कामाला महत्त्व देत नाहीत. त्याचबरोबर तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असाल किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर घरासह नातेवाईक आणि इतर ओळखीचे लोकही तुमच्याकडे आदराने पाहतात.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ mewsinsta नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी कॅप्शनमध्ये “आता जागे होण्याची वेळ आली आहे, विवाहातील समस्या यापुढे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही.” लिहलं आहे. तसेच नेटकरीही व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं लिहलंय, “आजकालची तरुणाई अजिबात अॅडजस्ट करत नाही” तर आणखी एकानं, ”अरेंज मॅरेज किती भीतीदायक आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.