Shocking video: निसर्गाची किमया अफाट आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्टीत एक आश्चर्य दडलेले आहे. निसर्गाने माणूस, पशी, पशी , हवा, अग्नी, पृथ्वी, वायू, पाणी, झाडे, पशू -पक्षी, वेली यांची निर्मिती केली आहे.भारतात पावसाचा एक निश्चित ऋतू आणि कालावधी असतो. तो म्हणजे मान्सून. भारतात मान्सून येण्यापूर्वी उन्हाळ्यातही पाऊस होतो. याला मान्सूनपूर्व पाऊस म्हणतात. पण आता हिवाळ्यातही पाऊस पडतोय.
नुकताच सोशल मिडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात निसर्गाचा अद्भूत चमत्कार दाखवण्यात आला. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की, पाऊस पडत असल्यास संपूर्ण वातावरण हे ढगाळ बनते. वेगवेगळ्या भागात पडणाऱ्या पावसाची क्षमता कमी-जास्त असू शकते. पण एकाच रस्त्यावर अर्ध्या बाजूला पाऊस तर अर्ध्या बाजूला ऊन असे चमत्कारी दृश्य तुम्ही पाहिले आहे का? नसेल तर आता व्हिडिओत तुम्हाला ते पाहता येणार आहे. या अनोख्या आणि आश्चर्यकारक दृश्यांनी सोशल मिडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल…
या व्हिडिओमध्ये तु्म्ही पाहू शकता, एकाच रस्त्यावर एका बाजूला जोरजोरात पाऊस पडत आहे तर दुसऱ्या बाजूला ऊन पडत असल्याचे दिसते. व्हिडिओत दिसून आलेल्या या घटनेला “सूर्यपाऊस” म्हणून ओळखले जाते. यात एकाचवेळी ढग फक्त आंशिक भागावर असतात, त्यामुळे काही भागात पाऊस पडतो आणि काही भागात सूर्य तळपत राहतो. या वेळी आकाशात इंद्रधनुष्य दिसण्याची शक्यताही जास्त असते. महाराष्ट्रात मराठीमध्ये याला “कोल्ह्याचे लग्न” असंही म्हटलं जातं. या वाक्प्रचाराचा वापर नैसर्गिक घटनेसाठी केला जातो, म्हणजेच जेव्हा पाऊस पडत असतो आणि त्याच वेळी ऊनही असते. व्हिडिओतील या दृश्यांनी लोकांना मात्र चांगलंच अचंबित केलं आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ weekendvibeswithvarma नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही अश्चर्य व्यक्त करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
