Snake Mating Viral video : सापांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे शिकारीचे, तर कधी लढाईचे, तर काही फारच थक्क करणारे असतात. वाटेतून जात असताना साप दिसला की पहिल्यांदा आपण दोन पावले मागे फिरतो. साप चावण्याच्या भितीने आपण सावध होत बाजूला जातो. परंतु तुम्ही दोन सापांचं मिलन होताना पाहिलं आहे का? त्यात आता सापांच्या मिलनाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात सापांची जोडी मिलनात मग्न असल्याचे दिसतेय. हे दृश्य पाहतानाही तुमच्या अंगावर काटा येईल. सापांची ही जोडी प्रेमात मग्न असल्याचे दिसून येते.

या व्हायरल व्हिडिओमध्ये सापांची जोडी अचानक बाजूच्या झाडाझुडपातून रस्त्यावर येत असल्याचं दिसत आहे. एकमेकांभोवती वेटोळे घालणारी ही सापाची जोडी बराच काळ रस्त्यावर आहे. साप असे एकमेकांच्या जवळ मिलनाच्या काळातच येतात. सगळ्यांसमोर ते खरंतर असे एकमेकांच्या जवळ येत नाहीत. व्हायरल व्हिडिओमध्ये जे दिसतंय ते बघितल्यानंतर तुमच्या अंगावर काटा उभा राहील.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, दोघेही साप प्रणयक्रीडा करताना दिसत आहेत. एका जंगल परिसरात या सापांचा रोमान्स सुरू असल्याचं दिसून येतंय. या व्हिडीओमधील हे साप जवळपास आठ फूट लांबीचे असून दोघेही एकमेकांना अलिंगन देत एकमेकांभोवती गुंडाळलेले या व्हिडीओत दिसत आहे. नर आणि मादी दोन्ही साप बराच वेळ एकमेकांना चिकटून राहतात. हे दृश्य पाहताना असं वाटतं की, दोघं एकमेकांशी लढाई करतायत; मात्र हे त्यांचं नैसर्गिक मिलन आहे. 

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ sarpmitra_pravin_patil नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक याला निसर्गाचा एक अनोखा चमत्कार असल्याचे म्हणत आहेत. तर, काही जण याला शुभ संकेत असल्याचे म्हणतायत. कारण- भारतीय संस्कृतीत सापाची जोडी पाहणं हे बहुतेकदा समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं. काही लोकांनी या व्हिडीओला भयानकदेखील म्हटले आहे.