Shocking video: एका तरुणीवर अनेक तरुणांचा जीव जडला आणि मग तिला इम्प्रेस करण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा लागली. तिच्यावर आपलं सर्वात जास्त प्रेम आहे हे सिद्ध करून तिला आपलं करण्यासाठी धडपड सुरू झाली. एका तरुणीला इम्प्रेस करण्यासाठी किती पापड बेलावे लागतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण प्रेमाची अशी परीक्षा फक्त माणसांनाच नव्हे तर प्राण्यांनाही द्यावी लागते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साप दुपारच्या उन्हात रस्त्यावर एका मादीसाठी हाणामारी करताना दिसले. होय, हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामधले काही व्हिडीओ हसवणारे असतात तर काही व्हिडीओ पाहून घाम फुटतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. असा प्रकार तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल एवढं नक्की.

साप किती घातक असतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. विशेषतः जेव्हा एखाद्या सापासोबत तुमचा सामना होतो तेव्हा परिणाम काय होईल, याची कल्पना न केलेलीच बरी. मात्र याठिकाणी सापच एकमेकांना भिडले आहेत. दोघांमध्ये एवढी जबरदस्त मारामारी झाली आणि मग काय झालं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा व्हिडीओ पुण्यातील असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका मादीला आपल्याकडे आकर्षित करण्याचा या सापांचा प्रयत्न होता. व्हिडीओत पाहू शकता दोन साप एकमेकांना लपेटून भांडत आहेत. एकमेकांना ती जबरदस्त टक्कर देत आहेत. सापांची ही लढाई काही वेळ सुरुच होती. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही तीन साप पाहू शकता. यापैकी दोन साप एकमेकांशी लढत आहेत. आणि तीसरा साप पाठीमागून त्यांची लढाई पाहात आहे. यात कुणी हरलं नाही, कुणाचा जीव गेला नाही. पण दोघांपैकी एक थकला आणि तो तिथून दूर निघून गेला.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @WeUttarPradesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकऱ्यांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं “पोरीचा नाद बेकार” अशी गमतीशीर प्रतिक्रिया दिलीय.