Shocking video: नवरा बायकोमधील नातं हे प्रेम आणि विश्वासावर अवलंबून असतं. लग्नात वधू वर एकमेकांना वचन देतात की, कुठल्याही संकटात आपण एकमेकांसोबत उभी राहू, कायम एकमेकांवर प्रेम करु आणि एकनिष्ठ राहू…पण जेव्हा या नात्यात तिसऱ्याची एन्ट्री होते तेव्हा या सगळ्या वचनांवर पाणी फिरतं. गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा संबंधामागील कारणं वेगवेगळी असतात. पण लग्नाच्या नात्याला जेव्हा तडा जातो. तेव्हा आयुष्यात आता काही उरलं नाही असंच काहीस जाणवतं.

सोशल मीडियावर नवरा बायको आणि तिसरा व्यक्तीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एका नवऱ्यावरून दोन महिलांची रस्त्यावरच जोरदार हाणामारी झालेली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दोन लग्न केल्यानंतर पतीची काय अवस्था होते हे तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलंच असेल. पण प्रत्यक्षात असं घडलं तर काय होईल? असंच एक प्रकरण समोर आलं आहे. जिथं दोन बायका करून नवरा पुरता फसला आहे.व्हिडीओत तुम्हाला दिसेल की दुसऱ्या बायकोसोबत नवऱ्याला पाहून त्याच्या पहिल्या बायकोचा पारा चढतो आणि ती नवऱ्याला तिथेच मारायला सुरुवात करते. हे पाहताच दुसरी बायको त्याच्या पहिल्या बायकोच्या अंगावर धावून येते. त्या एकमेकींचे केस ओढतात. भर रस्त्यात दोघींनीही अक्षरश: हद्दच पार केलीय. दोघीही एकमेकींवर अक्षरश: तुटून पडल्या आहेत. घडलेला हा प्रकार उत्तर प्रदेशमधील मेरठचा आहे. गेल्या काही वर्षात मेरठमध्ये अशा काही घटना घडल्या ज्याने संपूर्ण देश हादरुन गेला.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडिया एक्सवरील @@lalluram_news या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. याआधीही नवरा-बायकोमध्ये भररस्त्यावरील हाणामारीचे तसेच वादावादीचे व्हिडिओ तूफान व्हायरल झाले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर कमेंट करत आहेत. एकानं म्हंटलंय, यामध्ये संपूर्ण चूक नवऱ्याची आहे, तर आणखी एकानं नवऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे.