Shocking Video Viral : अमेरिकेत काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. विविध भागांत सुरू असलेल्या हिमवर्षावामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. प्रचंड बर्फवृष्टी आणि अतिशय तीव्रतेनं वाहणाऱ्या शीतलहरींमुळे नागरिकांना घराबाहेर पडणं अवघड जात आहे. अनेकांची वाहनं बर्फानं झाकून गेलीत, अशा परिस्थितीत वाहनं बाहेर काढणं आता अवघड होऊन बसले आहे. सध्या अमेरिकेतील कडाक्याच्या बर्फवृष्टीतील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात कारवरील बर्फ साफ करण्यासाठी एका बापानं तीन महिन्यांच्या बाळाबरोबर जीवघेणं कृत्य केलं आहे. हा व्हि़डीओ पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, या निर्दयी बापाला आता अटक करून, त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली आहे. अमेरिकेच्या टेक्सासमधील पोर्ट आर्थर भागातील एका बापानं कडाक्याच्या बर्फवृष्टीत कारवरील बर्फ साफ करण्यासाठी चक्क पोटच्या तीन महिन्यांचा बाळाचा वापर केला आहे,

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, काळ्या रंगाचं जॅकेट घातलेलं एक बाळ आहे. तर त्याच्या बापानं शॉर्ट-स्लीव्ह शर्ट आणि पँट परिधान केली आहे. या तीन महिन्यांच्या बाळाला त्या बापानं ह्युंदाई एलांट्रा कारच्या विंडशील्डवर ठेवलं आहे आणि हसत हसत तो बाप कारवर ज्याप्रमाणे फडका फिरवतात अगदी त्याचप्रमाणे बर्फ साफ करण्यासाठी बाळाचा वापर करीत आहे. तो बाळाच्या जॅकेटला धरून कारवरील बर्फ साफ करतोय. त्यासाठी तो बाळाला अक्षरश: कारवर रगडतोय. इतक्या कडाक्याच्या थंडीत चिमुकल्या बाळाबरोबर असं निर्दयी कृत्य तो बाप करु शकतो, असा सवाल आता उपस्थित होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे कृत्य करताना तो चक्क हसताना दिसतोय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोर्ट आर्थर पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात अटक वॉरंट जारी करीत कारवाई केली जाईल, असे सांगितले. तसेच जेव्हा व्हिडीओ शूट केला जात होता तेव्हा त्या व्यक्तीबरोबर दोन महिला होत्या आणि त्यातील एक महिला बाळाची आई होती, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे या घटनेतील जे दोषी असतील त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. पण अशाप्रकारे टिकटॉक व्हिडीओसाठी बाळाबरोबर कडाक्याच्या थंडीत अशाप्रकारचे कृत्य करणं तुम्हाला योग्य वाटलं का? आम्हाला कमेंट करुन सांगा.