Indian Railways Video: भारतात गर्दीच्या गाड्यांचे आणि जीव धोक्यात घालून प्रवासी चढण्याचे व्हिडीओ नवीन नाहीत. पण, सध्या एक थरारक VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत प्रवासी अगदी जीवाची पर्वा न करता, नियम मोडून, ट्रेनच्या दरवाजावर एकमेकांना ढकलत चढताना दिसत आहेत. एवढंच नव्हे, तर लहान मुलं, तरुण आणि वयोवृद्धदेखील या धोकादायक प्रकारात सामील झाल्याचे दिसतेय.

रेल्वे रुळावरचा एक थरारक VIDEO सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. प्रवासी सीट मिळवण्यासाठी जी धावपळ करीत आहेत, ती पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. रेल्वे नियम धाब्यावर बसवून प्रवाशांनी उचललेला हा थरार आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडीओ कुठला?

हा व्हिडीओ Reddit वर Just look at them या नावाने शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये प्रवासी ट्रेनमध्ये घुसण्यासाठी एकमेकांना धक्काबुक्की करताना दिसतात, तर पुढचे लोक कसेबसे आत घुसतात, तर मागचे लोक थेट रुळांच्या बाजूला उभे राहून ट्रेनमध्ये चढण्याची वाट पाहत होते.

ही ट्रेन जोधपूर ते रेवाडी अशी प्रवास करीत होती. पार्श्वभूमीला रेल्वेच्या ध्वनिवर्धकावरून अधिकारी प्रवाशांना नियम पाळण्याचं आवाहन करत होते. तरीही प्रवासी बेफिकीरपणे नियम धाब्यावर बसवून, गर्दीतून आपला जीव धोक्यात घालून ट्रेनमध्ये चढत होते.

नेटिझन्स काय म्हणाले?

हा VIDEO पाहून नेटकरी अक्षरशः हादरले. काहींनी भारतीय रेल्वेतील शिस्तीचा अभाव आणि नागरी जाणिवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर काहींनी प्रवाशांच्या मजबुरीबद्दल सहानुभूती व्यक्त केली. एका युजरने लिहिलं, “हे आपल्याकडच्या नागरी जाणिवेचं खरं चित्र आहे. पण, थोडं त्यांच्या दृष्टिकोनातून पाहा… कदाचित सीट मिळवण्यासाठी ते अशी धावपळ करत असतील. कारण- जनरल बोगीत पहिला आला, त्याला सीट मिळते, नाही तर लांब पल्ल्याचा प्रवास उभं राहून करावा लागतो.” तर काहींनी याची तुलना मुंबईच्या लोकल ट्रेनशी केली.

येथे पाहा व्हिडीओ

Just look at them
byu/Little-Fuel9858 inindianrailways

धोक्याचा इशारा

या व्हायरल व्हिडीओनं पुन्हा एकदा देशातील रेल्वे प्रवास किती धोकादायक असू शकतो यावर प्रकाश टाकला आहे. सीट मिळवण्याच्या धडपडीत प्रवासी आपला जीव किती स्वस्तात पणाला लावत आहेत, हे पाहून इंटरनेट दोन गटांत विभागलं आहे – कुणी प्रवाशांवर ताशेरे ओढतंय, तर कुणी त्यांच्या हक्काच्या जागेसाठीच्या धडपडीचं समर्थन करतंय.