बाप लेकीचं नातं अनोखं असतं. आपली लेक ही बापासाठी सर्वांत मोठा आनंद असतो. दोघांचाही एकमेकांवर अफाट जीव असतो. वडील आणि मुलीच्या नात्यात एक वेगळ्याच प्रकारचा भावनिक ओलावा असतो. प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील हे ‘हिरो’च असतात. आपल्या या हिरोसाठी मुलगी काहीही करू शकते. आपले वडिल कधीच आपल्यापासून दूर जाऊ नये असं प्रत्येक मुलीला वाटतं दरम्यान अमेरिकेतून एक प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये तीन मुलींच्या वडिलांचं निधन होतं आणि त्या चार वर्षानंतर त्यांच्या वडिलांच्या हृदयाचे ठोके एकू शकल्या. तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना? पण हे खरंय. हा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं काय प्रकरण आहे पाहुयात.
अमेरिकेतील कनेक्टिकट येथील तीन बहिणींना त्यांच्या दिवंगत वडिलांच्या निधनानंतर चार वर्षांनंतर हृदयाचे ठोके ऐकता आले. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी त्यांचे हृदय दान केले होते. त्यानंतर वडिलांचे हृदय गरज असणाऱ्या व्यक्तीला देण्यात आले आणि आता या मुलींनी त्या व्यक्तीची भेट घेतली आहे. बहिणींचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमेरिकेतील या मुलींनी वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे हृदय दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांना आशा होती की एक दिवस त्यांना त्यांची हृदयाची धडधडत पुन्हा एकू येईल.आणि चार वर्षानंतर ती इच्छा पूर्ण झाली.
दरम्यान त्यांच्या या निर्णयामुळे एक जीव वाचवण्यासाठी मदतही झाली. ज्या व्यक्तीला हे हृदय दान करण्यात आलं त्याचा २०१६ ध्ये कार अपघाता झाला, यामध्ये त्याला अनेक हृदयविकारांचा सामना करावा लागला. शेवटी त्याला पाय कापण्याची आणि हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता होती. जुलै २०१९ मध्ये, त्याला एस्टेबन सॅंटियागोचे हृदय मिळाले, ज्यामुळे त्यांचा पुर्नजन्म झाला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – तक्रार करून ६ तास झाले, तरीही अधिकारी झोपलेलेच; वैतागून त्यानं सापच ऑफिसमध्ये सोडला, VIDEO व्हायरल
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मुली एक एक करुन वडिलांच्या हृदयाची धडधडत एकत आहेत. यावेळी त्या सगळ्या भावूक झाल्या असून त्यांना वडिलांची आठवण झाली. नेटकऱ्यांनीही हा व्हिडीओ पाहून बहिणींच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे.