Brother Sister Relation Viral Video बहिण आणि भावाचं नात्याविषयी बोलावं तितकं कमी… जगातील सुंदर नातं असा उल्लेख केला तर वावगं ठरणार नाही. तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना, अशी भावाबहिणीच्या नात्याची गत… काहीही झालं तरी एका मुलाला भक्कम पाठिंबा मिळतो तो लाडक्या बहिणीकडूनच.जगातील ‘खट्टा मीठा’ असं कोणतं नातं असेल तर ते भावा बहिणीचं नातं. सर्वात जास्त काळजी करणारी असते ती लाडकी बहीण. कोणत्याही संकटाच्या काळात पाठीशी उभी राहते आणि भावाची सगळी सिक्रेट माहिती असणारी देखील तीच असते. बहिण भावांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक व्हायरल झालेले पाहिले असतील. असाच एक व्हिडिओ सध्या ट्रेंडिंगमध्ये असल्याचं दिसतंय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आपल्या नुकत्याच जन्मलेल्या भावाला पाहून चिमुकली बहीण फराच भावूक झालेली पाहायला मिळतेय. नुकतंच जन्मलेल्या बाळाला भेटयला ही चिमुकली बाबांसोबत हॉस्पिटलमध्ये आलेली आहे. दरम्यान ती आईजवळ असलेल्या लहान बाळाला म्हणजेच तिच्या लहान भावाला पाहते आणि धावत त्यांच्याजवळ जाऊन भावूक होते. हे चिमुकलं गोंडसं बाळ पाहून तिला रडू येतं तर आता आपल्यापेक्षाही कुणीतरी लहान घरी येणार हे पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंदही दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – आनंद महिंद्रांनी सांगितलं यशाचे रहस्य, चिम्पांझीचा VIDEO शेअर करत म्हणाले; “तुम्हीही तुमच्या सहकाऱ्यांना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या या निरागस बहिणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान शेअर होत असल्याचं दिसतंय. या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप लाईक केलं जात आहे. अनेक जण यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘अशी बहीण सर्वांना मिळो’ तर दुसऱ्या युजरने लिहिले, ‘बालपणीची आठवण आली.’