Slap Rule : खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना महिन्याचे टार्गेट दिले जाते. त्या टार्गेटवर कर्मचाऱ्यांची चांगली, वाईट कामगिरी ठरली जाते. कधी कधी हे टार्गेट पूर्ण होतात, तर कधी होत नाहीत. अशावेळी कंपन्या कर्मचाऱ्यांना कामाच्या काही मर्यादा निश्चित करून देतात. पण ज्या कर्मचाऱ्यांचे टार्गेट पूर्ण होत नाही त्यांच्याकडून टार्गेट पूर्ण करुन घेण्यासाठीही कंपन्या काही ना काही युक्त्या लढवत असतात. अशाच एका कंपनीने कर्मचाऱ्यांकडून टार्गेट पूर्ण करून घेण्यासाठी असा काय एक नियम बनवला आहे, ज्या नियमामुळे कर्मचारी लाजेने का होई ना टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. या कंपनीने असा नियम बनवला आहे की, जे कर्मचारी चांगली कामगिरी करत नाहीत ते कर्मचारी सर्वांसमोर एकमेकांच्या थोबाडीत मारतील. सध्या कंपनीचा हा नियम चांगलाच चर्चेत आहे.
हाँगकाँगच्या विमा कंपनीने हा नियम बनवल्याचे बोलले जात आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने स्थानिक हवाल्याने आपल्या एका वृत्तात याबाबत माहिती दिली आहे. ज्यात लिहिले आहे की, हाँगकाँगमधील एका कंपनीने एक आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, वर्षाखेरीज होणाऱ्या डिनर पार्टीनिमित्ताने वर्षभर खराब कामगिरी करणारे कर्मचारी एकमेकांच्या थोबाडीत मारतील.
Video : असा शिक्षक होणे नाही! बायोलॉजी आणि सोशियोलॉजी मधील फरक ऐकूण तुम्हाला हसू आवरणे होईल कठीण
रिपोर्टनुसार, कंपनीशी संबंधित एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याने दावा केला की, कंपनीच्या अधिकाऱ्याने अशा सुमारे डझनभर कर्मचाऱ्यांना एका स्टेजवर उभे केले, यावेळी ज्यांची कामगिरी खराब होती त्यांना एकमेकांच्या थोबाडीत मारण्यास सांगण्यात आले होते. हे सर्व कर्मचारी असे कर्मचारी होते ज्यांचे टार्गेट पूर्ण होऊ शकले नव्हते.
अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, या कर्मचाऱ्यांनी खरचं एकमेकांच्या थोबाडीत मारली. या व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली आहे. त्याचबरोबर यावर लवकरच कारवाई होऊ शकते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पण सोशल मीडियावर मात्र या कंपनीच्या नियमाची चांगलीच चर्चा होत आहे.