विचार करा की तुम्ही फ्लाईट पकडण्यासाठी विमानतळावर (Airport) गेला आहात आणि अचानक तुमच्यासमोर साप आला तर? सहाजिकच विमानतळावर साप फिरताना पाहून कोणालाही भीती वाटेल. मात्र, अशीच एक घटना घडली आहे मलेशियामध्ये…एअर एशियाच्या डोमेस्टिक फ्लाइटमध्ये प्रवासी आणि क्रू मेंबर्सना अचानक केबिनच्या प्रकाशात एक महाकाय साप दिसला, त्यानंतर आतील प्रवाशांनी गोंधळ घातला. त्यामुळे विमानाचं तत्काळ लँडिंग करण्यात आलं. या अजब घटनेनंतर प्रवासी चांगलेच बिथरले. तत्काळ लँडिंग केल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला.

AirAsia फ्लाइट क्रमांक AK 5748 हे विमान क्वालालंपूरमधून तवाऊकडे निघालं होतं. केबिन लाईट जवळ एक महाकाय साप प्रवाशांच्या अंगावर सरकत असल्याचे पाहून प्रवाशांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. विमानाचे मुख्य सुरक्षा अधिकारी कॅप्टन लिओंग टीएन लिंग यांनी सांगितले की, ही एक अत्यंत दुर्लभ घटना आहे, जो कोणत्याही विमानात घडू शकते.

मुख्य सुरक्षा अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार, खबरदारीचे पाऊल म्हणून एअरएशियाची उड्डाणे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. विमानात साप सापडल्याच्या या घटनेत कोणालाही इजा झाली नसल्याची माहिती कॅप्टन लिओंग यांनी दिली आहे. मात्र, सापाचे काय झाले याबाबत त्यांनी काहीही सांगितले नाही.

आणखी वाचा : बसमध्ये घुसून महिलेनं ड्रायव्हरला केलेल्या मारहाणीचा VIDEO VIRAL

एअरएशियाच्या देशांतर्गत उड्डाणाच्या दरम्यान प्रवासी आणि क्रू मेंबर्सची नजर अचानक सापावर पडल्याचे सांगितले जात आहे. ओव्हरहेड लाईटजवळ साप फिरताना पाहून प्रवासी घाबरले. त्यानंतर पायलटने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि इतर कारणांसाठी विमान वळवून इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.

ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. विमानातील त्या सापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याची घोषणा ऐकू येत आहे.

आणखी वाचा : KISS DAY 2022 : ५८ तास, ३५ मिनिटे आणि ५८ सेकंदापर्यंत ‘किस’ करत रचला वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : कोयना अभयारण्यातील शिवसागर जलाशयात सांबराची स्विमिंग पाहून पर्यटक आश्चर्यचकीत, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विमानात साप कसा घुसला हे अद्याप समजू शकलेले नाही. तो स्वत:हून केबिनमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला की तो प्रवाशाच्या सामानातून तिथे पोहोचला की प्रवासी घेऊन तो तिथे पोहोचला. पण, विमान उतरल्यानंतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढेपर्यंत त्यांच्यासह क्रू मेंबर्समध्ये घबराट पसरली होती.