Python Climbing Tree Viral Video : जगभरात साप, अजगराच्या विविध प्रजाती आढळतात. त्यातील काही प्रजाती विषारी, तर काही महाकाय शरीरासाठी ओळखल्या जातात. पण साप, अजगर कोणत्याही प्रजातीचा का असेना माणसाला त्याची भीती वाटतेच. कारण- विषारी सापाचा एक दंश आणि अजगराचा एक विळखा माणसाच्या मृत्यूचे कारण ठरू शकतो. त्यामुळे लोक साप, अजगरापासून अंतर ठेवून राहतात. सध्या सोशल मीडियावर एका अजगराचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यात अजगर रात्रीच्या अंधारात झाडावर सरसर चढतोय ते पाहून तुम्हालाही घाम फुटेल.

आतापर्यंत तुम्ही अजगराला शिकार करताना पाहिलं असेल, तो शिकार गिळत असतानाचे भयानक व्हिडीओ पाहिले असतील. आताच्या या व्हिडीओत अजगर इतर प्राण्यांप्रमाणे झाडावर सरसर चढताना दिसू शकतो, असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं, तर विश्वास बसणार नाही. पण हे खरंय… एका भल्या उंच झाडावर अजगर सरसर चढतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. कारण- एकदम सरळ झाडावर चढणं ही काही साधी गोष्ट नाही. माणसालाही अशा झाडांवर चढण्यासाठी यंत्राचा किंवा काहीतरी तंत्राचा वापर करावा लागतो. पण, या व्हिडीओत अजगर कोणत्याही यंत्राचा वापर करीत सरसर चढतोय. त्याची चढण्याची पद्धतही इतकी भयानक आहे की, पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, अजगर अगदी उंच झाडाला आधी वेटोळा घालतो. त्यानंतर तो सरसर वर चढू लागतो. तोंड अगदी वरच्या दिशेने ठेवत तो झाडाला वेटोळे घालत घालत वर जातो. विशेष म्हणजे रात्रीच्या काळोखात तो इतक्या पद्धतशीरपणे झाडावर चढतोय की, ते पाहून तुम्हीही घाबरून जाल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत अद्याप काही माहिती कळू शकलेली नाही. हा व्हिडीओ जितका हैराण करणारा आहे, तितकाच अंगावर काटा आणणारादेखील आहे.