Hens Attack Snake Video: साप म्हणजे सर्वात घातक शिकारी असं आपण सगळ्यांनी ऐकलंय. पण जर तुमच्या डोळ्यांसमोर दोन साध्याशा कोंबड्या एका सापाला चोचांनी टोचून मारत असतील, तर? विश्वास बसणार नाही, पण सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा थरकाप उडवणारा व्हिडीओ निसर्गाच्या अनपेक्षित नियमांना उघडं पाडतो. जिथं एकीकडे साप फणा काढून शौर्य दाखवतोय, तिथं कोंबड्या त्याला अक्षरशः खेचून टोचतात. हल्ला इतका जबरदस्त की, शेवटचा क्षण पाहून तुमच्याही अंगावर शहारा येईल.

सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो नुसता पाहिला तरी डोळे फाटतील. साप फणा काढून उभा राहतो, पळायचा प्रयत्न करतो… पण त्या दोन कोंबड्या त्याला जिवंत सोडायला तयार नसतात. कोण म्हणतं कोंबड्या सौम्य असतात? या व्हिडीओनं सगळा समजच उलटवून टाकला आहे. व्हिडीओचा शेवट बघून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल… नेमकं काय घडलं जाणून घ्या सविस्तर…

सामान्यतः साप दिसला की माणसासह प्राणीही घाबरतात. पण, जे काही या व्हिडीओमध्ये दिसतंय ते कल्पनेच्या कित्येक पातळींवर जाऊन थक्क करणारं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये दोन कोंबड्या चक्क एका लहान सापावर जीवघेणा हल्ला करताना दिसत आहेत. या घटनेने सगळ्यांची मनं ढवळून निघाली आहेत. ही घटना एका गावातली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या व्हिडीओत दिसतं की, एक साप फणा काढून उभा आहे आणि त्याच्या समोर दोन कोंबड्या टवटवीत डोळ्यांनी त्याच्याकडे बघत आहेत. सापाने आपला जीव वाचवायचा प्रयत्न केला, पण त्या दोन्ही कोंबड्या जरासुद्धा डगमगल्या नाहीत. त्यांनी सापावर तुटून पडत त्याला चोचीने मारायला सुरुवात केली.

साप एकीकडे जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता, पण कोंबड्या त्याला खेचत टोचून मारत होत्या. इतकंच नाही तर त्या दोघींमध्ये त्या सापाला खाण्यासाठी चुरशीची चुरसही दिसते. एका क्षणी तर त्या एकमेकींवर चिडल्यासारख्या भासत होत्या. जणू काही ‘कोण खाणार साप?’ अशी स्पर्धाच लागली होती.

येथे पाहा व्हिडीओ

सामान्यतः शांत भासणाऱ्या कोंबड्यांनी सापावर केलेला हा आक्रमक हल्ला अनेकांना धक्कादायक वाटतोय. प्रेक्षक कमेंटमध्ये कोंबड्यांच्या हिमतीचं कौतुक करत आहेत, तर काहींना सापाची अवस्था बघून वाईटही वाटतंय. हा व्हिडीओ एक गोष्ट स्पष्ट करून जातो. प्रकृतीत कोणाचं वर्चस्व किती काळ टिकेल, हे सांगता येत नाही.