Cobra vs Rabbit Video Viral : साप आणि मुंगूसाचं भांडण तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. साप-मुंगूसाच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. पण आता जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तो तुम्ही याआधी क्वचितच पाहिला असेल. या व्हिडीओत साप आणि सशाचं जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दोघेही एकमेकांना भिडत असल्याचं पाहायला मिळत आहे. सापाने फणा काढताच सशाने काय केलं? या दोघांच्या भांडणात कोण जिंकतो? तुम्हाला या सर्व गोष्टी हा संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतरच माहित होतील.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक विशाल साप आणि एक ससा एकमेकांसमोर बसलेले असतात. साप सशाला त्याच्या फणा काढून चावण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर ससा स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करतो. पण साप फणा काढून सशावर पुन्हा पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. परंतु, सापाच्या या कृत्याबद्दल सशालाही राग येतो आणि ससाही सापाशी दोन हात करण्याचा प्रयत्न करतो. सशाचा रुद्रावतार पाहून सापाची हवा टाईट होते आणि तो तिथून पळून जातो. ससाही काही वेळ त्या सापाचा पाठलाग करतो.

नक्की वाचा – वीजेच्या तारेवर पक्षी कसे झोपतात? झोपल्यावरही ते खाली का पडत नाहीत? यामागचं कारण जाणून तुम्हीही चकित व्हाल

इथे पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Giselle Koo (@gisellegk8)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर gisellegk8 नावाच्या युजरने पोस्ट केला आहे. व्हिडीओता आतापर्यंत एक लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं की, “सशाची पिल्लं आजूबाजूला असतील, त्यामुळे सशाने सापाला त्यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला, असं मला वाटतंय.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं की, ससा खूप बहादूर निघाला.