प्रत्येकामध्ये काहीतरी खास दडलंलेलं असतं — कधी नजरेआड गेलेलं, पण वेळ आली की चकित करून जाणारं!
प्रत्येक व्यक्ती, प्राणी किंवा गोष्ट ही आपल्यात एक वेगळी चमक घेऊन येते — जी नेहमी नजरेला पडत नाही, पण जेव्हा काळच तिची परीक्षा घेतो, तेव्हा ती आपलं अस्तित्व ठसवून जाते. म्हणूनच, कोणालाही केवळ त्याच्या दिसण्यावरून, वागण्यावरून, परिस्थितीवरून कमी लेखणं ही आपल्या नजरेची चूक असते — त्यांच्या क्षमतेची नव्हे.
आयुष्यात अनेक वेळा आपण अशा व्यक्ती पाहतो, ज्या शांत असतात, मागे असतात, दुर्लक्षित असतात. पण जेंव्हा प्रसंग कठीण होतो, तेंव्हा ह्याच व्यक्तींमध्ये इतकं धैर्य आणि बळ दिसतं की सगळे स्तब्ध होतात. अनेकदा ज्यांना दुर्बल समजलं जातं, तेच परिस्थितीचा डाव उलटवतात. म्हणूनच म्हणतात – कधीही कोणाला कमी लेखू नये!
याचीच प्रचिती सध्या एका व्हायरल व्हिडीओमधून पाहायला मिळते आहे — जिथे सिंह आणि वाघासारख्या जंगलातील जंगलातील हिंस्र प्राण्यांना एका साध्या कुत्र्याने जेरीस आणलं आहे.
सोशल मीडियावर रोज कित्येक वन्य प्राण्यांचे व्हिडिओ समोर येत असतात त्यापैकी काही मजेशीर असतात, काही भयावह असतात, काही आश्चर्यचकीत करणारे असतात तर काही व्हिडिओ चांगली शिकवण देणारे असतात. अनेकदा जे आपल्याला काही गोष्टी प्राण्यांकडून शिकायला मिळतात. अशाच प्रसंगाचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडीओमध्ये एक सामान्य कुत्रा जंगलाचा राजा मानला जाणारा सिंह आणि भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघाशी भिडताना दिसत आहे. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ बघा, त्यानंतर कदाचित तुम्हाला विश्वास बसेल.
खरंतर, व्हायरल व्हिडिओमध्ये एक सिंह आणि एक वाघ जंगलातील गवतावर बसून विश्रांती घेत असल्याचे दिसते. त्याच वेळी, एक कुत्रा त्यांच्या इथे येतो. कुत्रा तिथे पोहचल्यानंतर त्याच्या लक्षात येते की तो थेट मृत्यूच्या दारात पोहचला आहे पण तरीही तो न घाबरता उलट वाघ आणि सिंहावरच भुंकू लागतो. एवढंच नाही हा धाडसी कुत्रा वाघ अन् सिंहाच्या जवळ जाऊन भुंकतो. दोघेही कुत्र्याला पाहून त्याला हुसकवण्याचा प्रयत्न करतात आणि एवढंच नाही त्याला धडा शिकवण्यासाठी त्याच्यावर झडप घालतात. पण कुत्रा काही घाबरेना. पळून जाण्याऐवजी, कुत्रा सिंह आणि वाघाच्या अंगावर धावून जात आह अन् जोर जोरात भुंकतो, ज्यामुळे सिंह आणि वाघ एकदा मागे हटतात. पण तरीही कुत्रा शांत बसत नाही नव्हता. तो भुंकत राहिला. कुत्रा दोघांवरही मात करत असल्याचे दिसते. व्हिडिओच्या शेवटी, एक आश्चर्यकारक दृश्य दिसते. कुत्र्याने जंगलाच्या राजाला आव्हान दिले आणि त्याच्यावर झडप घातली. कुत्र्याचे धाडस पाहून सिंह आणि वाघ देखील आश्चर्यचकित झाले. कुत्र्याने दोघांनाही घाबरवले आणि अभिमानाने तेथून निघून गेला. वाघ आणि सिंह दोघेही त्याच्याकडे चकीत होऊन पाहताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कुत्रा लंगडत असल्याचे दिसते. जरी एक पाय खराब झाला असला तरी, कुत्रा अजिबात घाबरला नाही. एक निर्भय योद्धा ज्याने सिंह आणि वाघांचा सामना केला. कदाचित तो म्हणत असेल की आभार व्यक्त करा माधा पाय ठीक नाही नाहीतर अशी अवस्था केली असते. जेव्हा कुत्रा सिंह आणि वाघाशी लढत होता, तेव्हा दूर उभे असलेले जंगलातील अनेक प्राणी ते दृश्य पाहत होते. सिंह आणि वाघाला आव्हान दिल्यानंतर, कुत्रा अभिमानाने बाहेर आला. तिथे उपस्थित असलेले वन्य प्राणी देखील हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले असतील.
व्हिडिओवर मजेदार कमेंट्स येत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरSupreme star नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे. लोक सतत कमेंट्स करत आहेत. काही वापरकर्ते व्हिडिओ पाहून हैराण झाले आहेत, तर काही कुत्र्यांनी धाडस केले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “सिंह म्हणत असेल की मी कुत्र्याच्या नादी लागत नाही.”