Solar Eclipse 2025: २१ आणि २२ सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. मात्र, तरीही ग्रहणाचे नियम काही आवर्जून पाळतात. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याने यामुळे प्रवासावर कोणतेही धार्मिक बंधन नाही. असं असूनही शास्त्रांमध्ये ग्रहण हा अशुभ काळ असल्याचे वर्णन केले आहे. शक्य असल्यास प्रवास पुढे ढकलणे चांगले. सूर्य मंत्र, दान आणि सावधगिरी बाळगून प्रवास करता येऊ शकतो असे ज्योतिषशास्त्रानुसार सांगितले जाते.

ग्रहण आणि शास्त्र

भारतीय धर्मग्रंथांमध्ये ग्रहण हे देव आणि दानवांमधील संघर्षाचे प्रतीक मानले जाते. स्कंद पुराण आणि नाद संहितेत असे म्हटले आहे की, ग्रहणांच्या वेळी कृती शुभ किंवा अशुभ नसतात. याचाच अर्थ ग्रहणाच्या वेळी केलेल्या कृतींचे पूर्ण फळ मिळत नाही, त्या निष्फळ किंवा कमी फलदायी होतात. या कारणामुळे शास्त्रे ग्रहणाच्या वेळी प्रवास, नवीन काम, लग्न, करार किंवा गुंतवणूक टाळण्याचा सल्ला देतात.

सूर्यग्रहणात काय खास आहे?

२१ सप्टेंबर रात्री १० वाजून ५९ मिनिटांनी ते २२ सप्टेंबर पहाटे ३ वाजून २३ मिनिटांपर्यंत

सूर्य आणि चंद्राची स्थिती- दोन्ही कन्या राशीत असतील

नक्षत्र- उत्तराफाल्गुनी

भारतात दृश्यमानता- भारतात ग्रहणाचे दृश्यमान नाही. (हे प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण गोलार्धात दृश्यमान)

भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नसल्यामुळे इथे सुतक काळ पाळला जाणार नाही. याचा अर्थ मंदिरे खुली राहतील आणि धार्मिक विधींवर बंधने येणार नाहीत.

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहण म्हणजे सूर्य आणि चंद्राच्या ऊर्जेमधील असंतुलनाची स्थिती. याचा मानसिक स्थिरता, निर्णय घेण्याची क्षमता आणि प्रवास सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो. कन्या राशीतील ग्रहणामुळे प्रवासात गोंधळ, किरकोळ आणि मोठे अडथळे आणि मानसिक चिंता निर्माण होऊ शकते. ग्रहणकाळात घेतलेले नवीन उपक्रम म्हणजेच प्रवास किंवा नवीन करार या कार्यांचा अपेक्षित परिणा मिळत नाही.
तसंच जर प्रवास धार्मिक स्थळी किंवा धर्मादाय कार्यासाठी असेल तर तो अंशत: फायदेशीर ठरू शकतो.

प्रवास अशुभ का मानला जातो?

सुतकाची भीती- दृश्यमान असलेल्या ग्रहणाच्या वेळी वातावरणात नकारात्मक लहरी येण्याची शक्यता असते.

निसर्गाचे संतुलन- सूर्याच्या किरणांना रोखल्याने शरीर आणि मनावर परिणाम होतो. त्यामुळे लांबचा प्रवास असुरक्षित मानला जात असे.

व्यावहारिक कारणे- प्राचीन काळी रस्ते सुरक्षा, प्रकाश आणि अन्नाच्या अभावामुळे ग्रहणांच्या वेळी प्रवास थांबवला जात असे.

आधुनिक दृष्टिकोन

आताच्या जगात शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, ग्रहण ही केवळ खगोलीय घटना आहे. रेल्वे, हवाई आणि बस सेवा सामान्यपणे चालतात. भारतात ग्रहण दिसणार नाही, त्यामुळे वाहतूक विस्कळीत होणार नाही किंवा सामान्य कामांमध्येही व्यत्यय येणार नाही. तुमच्या धार्मिक श्रद्धा असतील तर तुम्ही मन:शांतीसाठी तुमचा प्रवास पुढे ढकलू शकता.

ग्रहणांमध्ये जर तुम्हाला प्रवास करावा लागणार असेल तर प्रवास करण्यापूर्वी ओम गृहिणी सर्याय नम: असा जप ११ वेळा करा. तांब्याच्या भांड्यात पाणी भरा आणि ते सूर्याला अर्पण करा. घरातून निघण्यापूर्वी गूळ किंवा मिठाई खा. प्रवास पूर्ण झाल्यावर एखाद्या गरिबाला दान करा.

राशीनुसार परिणाम काय होतात?

मेष- ग्रहण काळात लांबचा प्रवास टाळावा. मानसिक ताण वाढू शकतो.

वृषभ- कमी अंतराचा प्रवास शक्य आहे, मात्र मोठ्या प्रमाणात व्यवहार टाळा.

मिथुन- प्रवासात अडथळे आणि खर्च वाढू शकतात

कर्क- तुमचा परदेश प्रवासाचा बेत असेल तर तो पुढे ढकलणे योग्य ठरू शकते.

सिंह- ग्रहणामुळे मानसिक चिंता निर्माण होऊ शकते. त्यामुळे काळजीपूर्वक वाहन चालवा.

कन्या- याच राशीत ग्रहण होत आहे, त्यामुळे प्रवास पुढे ढकलणे योग्य ठरू शकते.

तूळ- सामान्य प्रवास चांगला आहे, मात्र गुंतवणुकीशी संबंधित प्रवास टाळा.

वृश्चिक- कुटुंबासह प्रवास करू शकता, मात्र तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

धनु- धार्मिक प्रवास फलदायी आहे, मात्र व्यावसायिक सहली टाळा.

मकर- लांबच्या प्रवासामुळे येणारा थकवा आणि खर्च.

कुंभ- अचानक नियोजन बिघडू शकते, म्हणून धीर धरा.

मीन- समुद्र किंवा जलवाहतुकीद्वारे प्रवास करणे टाळा किंवा काळजी घ्या.

हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याने प्रवासावर कोणतेही धार्मिक बंधन नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणाच्या काळात नवीन सुरूवात आणि लांब प्रवास टाळणे चांगले. प्रवास आवश्यक असल्यास मंत्र, नैवेद्य आणि देणग्या ग्रहणाचे परिणाम कमी करण्यास मदत करू शकतात.

(Disclaimer- वरील माहिती केवळ श्रद्धा आणि ज्योतिषशास्त्रानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. लोकसत्ता कोणत्याही माहितीचे समर्थन करत नाही.)