पद्म पुरस्कार प्राप्तकर्त्यांपैकी एक असलेल्या पश्चिम बंगालच्या नादिया येथील रहिवासी बिरेन कुमार बसाक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अशी एक खास भेट दिली की पंतप्रधान मोदी त्यांच्या भेटीचे चाहते झाले आहेत. बिरेन कुमार बसाक यांनी दिलेली भेट पंतप्रधानांना खूप आवडली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या भेटवस्तूचे कौतुक केले.

याबद्दल पंतप्रधान मोदींनी ट्विट करून लिहिले की, “श्री बिरेन कुमार बसाक हे पश्चिम बंगालमधील नादियाचे आहेत. ते एक प्रतिष्ठित विणकर आहे, जे आपल्या साड्यांमध्ये भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे विविध पैलू चित्रित करतात. पद्म पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना त्यांनी माझ्यासमोर असे काही सादर केले जे मला खूप प्रिय आहे.

( हे ही वाचा: गुजराती व्यावसायिकाने मुलाच्या लग्नासाठी छापली ४ किलोची लग्नपत्रिका; किंमत सात हजार रुपये! )

कोण आहेत बिरेन कुमार बिसाक?

बिरेन यांचा जन्म १६ मे १९५१ रोजी झाला. ते मूळचे कोलकाता येथील नादिया जिल्ह्यातील असून ते व्यवसायाने साडी विणकाम करतात. सुरुवातीच्या काळात खांद्यावर साड्यांचे बंडल घेऊन कोलकात्याच्या रस्त्यांवर फिरून ते साड्या विकायचे. आज ते कोट्यवधी रुपयांचे मालक आहेत, पण एक काळ असा होता जेव्हा ते विणकराकडे साडी नेसण्याचे काम दिवसाला २.५० रुपयांत करायचे.

बिरेन यांच्या मेहनतीला फळ मिळालं आणि प्रचंड संघर्षानंतर त्यांनी आपली साडी कंपनी ‘बसक अँड कंपनी’ स्थापन केली. आज त्याची उलाढाल ५० कोटी आहे. त्यांनी साडीवर रामायणाचे सात खंड लिहिले, ज्यासाठी ब्रिटिश विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट दिली. त्यांनी ही साडी १९९६ मध्ये डिझाइन केली होती. जी ६ यार्डची आहे. धाग्यात रामायण तयार करायला त्यांना एक वर्ष लागले, तर ते विणण्यासाठी सुमारे २ वर्षे लागली.

( हे ही वाचा: करीना कपूरच्या दुपट्टा मेरा गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल! )

बसाक यांच्या सहा यार्ड साडीवरील या जादुई कलाकृतीने त्यांना यापूर्वीच राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र पुरस्कार, संत कबीर पुरस्कार जिंकले आहेत. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड युनिक रेकॉर्ड्समध्येही त्यांचे नाव नोंदवले गेले आहे.

२००४ मध्ये, मुंबईस्थित कंपनीने बसाकला रामायणाच्या सात खंडांमध्ये लिहिलेल्या साडीच्या बदल्यात आठ लाख रुपये देऊ केले, जे त्यांनी नाकारले. साडीवर रामायण कोरल्यानंतर बसाक यांनी आता रवींद्रनाथ टागोरांचे जीवन कोरण्याची योजना आखली आहे आणि त्यासाठी ते तयारी करत आहेत.

( हे ही वाचा: Photos: “मी फक्त चकना खाल्ला, दारूच्या…” धोनी, रवी शास्त्री आणि हार्दिकच्या फोटोवर भन्नाट मिम्सचा व्हायरल! )

राष्ट्रपती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी ७३ व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान केले, त्यापैकी काहींना मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. यामध्ये २०२० सालासाठी चार पद्मविभूषण, आठ पद्मभूषण आणि ६१ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.