तंत्रज्ञानामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. मागच्या काही वर्षात तंत्रज्ञानाचा उपयोग करून वेगाने विकास झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतून तुम्हाला याबाबत कल्पना येईल. मॉल्समध्ये किंवा मोठ्या इमारतीत आपण आतापर्यंत लिफ्ट पाहिल्या आहेत. आता छोट्या पायऱ्यांसाठीही लिफ्टची व्यवस्था केली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना फायदा होत आहे. सोशल मीडियावर संबंधित लिफ्टचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हीलचेअरवर येणाऱ्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून या लिफ्टची निर्मिती केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका इमारतीच्या काही पायऱ्या दिसत आहेत. इमारतीच्या बाहेर एक महिला व्हीलचेअरवर बसलेली आहे. महिलेला इमारतीच्या आत जायचं असल्याने व्हिडीओ मेकरला हातवारे करून लिफ्टबद्दल सांगते. काही वेळातच इमारतीच्या पायऱ्या आत जाऊ लागतात. मग बाजूने आधारासाठी, दोन दरवाजे वरच्या दिशेने बाहेर येतात. यानंतर व्हीलचेअरवर बसलेली महिला आत जाते. महिलेच्या सुरक्षेसाठी आणि वर येण्याच्या प्रक्रियेत व्हिलचेअर खाली पडू नये, म्हणून मागून एक दरवाजा वर येतो. लिफ्ट वर जाते आणि ती बिल्डिंगमध्ये पोहोचते. ही ‘व्हीलचेअर लिफ्ट’ लंडनमध्ये आहे.

ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. या व्हिडीओ नेटकऱ्यांचा पसंतीस उतरत असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.