Shruti Sinha Shantanu Maheshwari Ruia Collage: प्रसिद्ध डान्सर व इन्फ्लुएन्सर श्रुती सिन्हा, शंतनू माहेश्वरीसह तिच्या ऍमेझॉन शॉर्ट फिल्म ‘कॅम्पस बीट्स 2’ च्या प्रमोशसाठी अलीकडेच मुंबईतील रुईया कॉलेजमध्ये पोहोचली होती. मात्र तिथे घडलेल्या एका प्रकारावरून श्रुती व शंतनू दोघांनीही फेस्टमधून तात्काळ निघून जाण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही आपापल्या इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये झाल्या प्रकारची माहिती देत नाराजी व्यक्त केली आहे. श्रुतीने तिच्या स्टोरीमध्ये कॉलेजच्या कर्मचार्‍यांनी असभ्य वर्तन केल्याबद्दल तसेच तिच्या कपड्यांना ‘अश्लील’ संबोधल्याचे म्हटले आहे. तर शंतनूने सुद्धा कॉलेजच्या पेजला टॅग करून तुम्ही इतके बुरसटलेल्या विचाराचे असाल असं वाटलं नव्हतं असंही म्हटलं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे हे पाहूया..

सुरुवातीला समोर आलेल्या माहितीनुसार, श्रुती सिन्हा आणि शंतनू माहेश्वरी एका कॉलेज फेस्टमध्ये पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र कॉलेजच्या प्रांगणात पोहोचताच अधिकाऱ्यांनी ड्रेस कोडचे पालन न केल्याचे नमूद करत श्रुतीला कपडे बदलण्यास किंवा जॅकेट घालण्यास सांगितलं. यानंतर नाराज होऊन ते दोघेही फेस्टमधून बाहेर पडले. दुसरीकडे, कलाकारांनी सांगितले की, ते उत्सवसाठी कॉलेजला गेलेच नव्हते शिवाय ड्रेसकोडविषयी त्यांना माहिती दिली गेली नव्हती. शिवाय महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी श्रुतीच्या कपड्यांना ‘अश्लील’ म्हणत थेट कपडे बदलायला सांगितले जे चुकीचे आहे.

पापाराझी ग्रुपपैकी एकाने ‘उत्सव’ नावाच्या कॉलेज फेस्टच्या आमंत्रणासह इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. शंतनूने कमेंटमध्ये घटनेबद्दल सविस्तर माहिती सांगत म्हणते की, “प्रथम, आम्हाला या “उत्सव फेस्टिवलसाठी” आमंत्रित केले गेले नव्हते, किंवा आम्हाला ड्रेसकोड विषयी काहीच सांगितलं नव्हतं, मी सुद्धा टॉर्न जीन्स घातली होती पण मला कुणीच अडवले नाही. एका मुलीला पाच पुरुषांनी, विद्यार्थी संघटनेनी, शिक्षकांनी अशाप्रकारे खाली खेचण्याचा प्रयत्न करताना पाहून मला धक्का बदला. नियम मोडायला कुणालाच आवडत नाही, मुख्यतः शाळा किंवा कॉलेजमध्ये नियम महत्त्वाचे असतातच आणि हे कलाकार म्हणून आम्ही सुद्धा समजतो.”

दरम्यान, श्रुतीनेही तिची भूमिका स्पष्ट केली आणि लिहिले, “टीम ‘उत्सव’साठी गेलेली नव्हती. आणि आम्हाला ड्रेस कोडबद्दल माहिती दिली गेली नाही. आणि त्याही वर, त्यांनी माझ्याशी बोलण्याची पद्धत, माझ्याकडे वर ते खालपर्यंत बोट दाखविण्याची पद्धत अत्यंत अनादरपूर्ण होती. श्रुतीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कॉलेजवर टीका करत पुढे लिहिले की, “मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते आणि मला उद्धटपणे स्वतःला झाकण्यास सांगितले गेले कारण त्यांच्या मते माझे कपडे अश्लील आहेत. म्हणून आम्ही बाहेर पडणे निघून गेलो. “

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॅम्पस बिट्स विषयी थोडक्यात..

‘कॅम्पस बीट्स 2’ मध्ये श्रुती सिन्हा आणि शंतनू माहेश्वरी मुख्य भूमिकेत असून, तन्वी गडकरी, सहज सिंग चहल, हर्ष डिंगवानी, तान्या भूषण, धनश्री यादव, तेरिया मगर, अदनान खान आणि रोहन पाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे Amazon miniTV वर पाहायला मिळणार आहे.