Viral video: आपला व्यवसाय, धंदा वाढावा, वस्तूंचा खूप खप व्हावा असे कोणत्या दुकानदाराला वाटणार नाही. यासाठी दुकानदार वेगवेगळ्या प्रकारे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पोस्टर लावतात. कोणताही व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो फक्त त्याची मार्केटींग करण्याचं स्किल तुमच्याकडे हवं. तुम्ही दुकानाच्या बाहेर वेगवेगळे पोस्टर, पाट्या पाहिल्या असतील. अनेकदा बंद दुकानाबाहेरही जाहिरातीच्या पाट्या, पोस्टर लावलेले असतात. यामध्ये दुकान भाड्याने देणे आहे, गाळा भाड्याने देणे आहे. तसेच कामासाठी मुली पाहिजेत असे पोस्टर असतात. म्हणजेच दुकानदार हे आपल्या व्यावसायासाठी काहीही करु करतात. अशाच एका पुणेकरानं अशा ठिकाणी व्यवसाय सुरु केला आहे की पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी व्यवसायीकाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्याला काम करायचंय, व्यवसाय करायचाय किंवा ज्याला आयुष्यात काहीतरी करायचंय तो कारणं शोधत बसत नाही तर जे आहे त्यात आणि जिथे आहे तिथेच काही ना काही सुरुवात करतो.

अशाच एका पुणकरानं भर बाजारात पाण्याच्या गर्दीतल्या तहानलेल्या लोकांना बाटल्या विकण्याचा व्यवसाय सुरु केला. आता तुम्हाला वाटलं असेल की त्यानं बाजारात दुकान सुरु केलं असेल. पण तसं नाही तर या पठ्ठ्याचं घर बाजाराच्या बाजूलाच आहे. अशावेळी हा व्यक्ती घराच्या भिंतीच्या आडून या पाण्याच्या बाटल्या विकत आहे. त्यानं भिंतीच्या पलिकडे झाडाला बॉटल्स सुद्धा लटकवलेल्या दिसत आहेत. सोबतच वडापवही हा विकत असल्याचं लावलेल्या पाटीवरुन दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ ek_puneri नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय “पुणेकर काय करतील आणि कुठे आपली क्रिएटिव्हिटी दाखवतील याचा नेम नाही.” तर आणखी एकानं “पुणेकरांचा नाद नाय!” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.