चिप्स खाल्ल्यानंतर रॅपर फेकून देतो पण, व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका महिलेने त्या रॅपरपासून हटके प्रयोग केला आहे. चिप्सचे रिकामे रॅपर डस्टबिनमध्ये फेकण्याऐवजी, तिने ते एकत्र बांधले आणि एक चमकदार साडी तयार केली. ही साडी आता सोशल मीडियावर चांगलीचं व्हायरल झाली आहे. याबाबत लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींना ते मजेदार वाटते, काहींना सर्जनशील.
या छोट्या क्लिपच्या सुरुवातीला ती महिला बटाट्याच्या चिप्सचे पॅकेट हातात घेऊन उभी असलेली दिसत आहे. ती इंग्रजी भाषेत स्टाईलमध्ये बोलते की, “ओह माय गॉड. तुम्ही म्हणाल की मी असे काहीही घालू शकत नाही. पण मी तुम्हाला दाखवते.” त्यानंतर ती स्त्री त्याच बटाट्याच्या चिप्सच्या अनेक रिकाम्या रॅपर्सपासून बनवलेली साडी नेसलेली दिसते. मात्र, बारकाईने पाहिल्यावर हे काय परिधान केले आहे, असे दिसते. पण महिलेची क्रिएटिविटी पाहून लोक नक्कीच थक्क होतात.
(हे ही वाचा: Video Viral: ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ गाण्यावरचा चिमुकल्याचा डान्स एकदा बघाच!)
(हे ही वाचा: Viral Photo: ‘या’ फोटोमध्ये हृदयाच्या आकाराचा फुगा कुठे आहे?)
१.५० लाखांहून अधिक व्ह्यूज
रिकाम्या चिप रॅपर्सपासून साडी बनवण्याचे हे अप्रतिम कौशल्य BeBadass.in या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘निळ्या लेस आणि साडीसाठी प्रेम.’ आतापर्यंत या व्हिडीओला ६ हजारांहून अधिक लाईक्स आणि १ लाख ५० हजार व्ह्यूज मिळाले आहेत. यावर युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या. एका व्यक्तीने गंमतीच्या स्वरात लिहिले – साडी तर अशी असावी, नाहीतर नसावी!