ग्रामीण भागात आजही काही घरं शेणाने सारवलेली दिसतात. आंगण, घराच्या भितींना शेण लावून सजावट केली जाते. तसेच चुलतही शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या वापरल्या जातात. खेडोपाड्यात शेणाचा अनेकप्रकारे वापर होतो. पण एका व्यक्तीने या सगळ्यांच्या पुढे जाऊन एक विचार केला आणि चक्क शेणापासून मोबाईकलचं कव्हर बनवलं आहे. हे इकोफ्रेंडली मोबाईल कव्हर तुम्हाला मोबाईलमधून निघणाऱ्या हानीकारक रेडिएशनपासून दूर ठेवते. असा दावा या व्यक्तीने केला आहे. इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या व्यक्तीने शेणापासून तयार केलेले मोबाईल कव्हर दिसत आहे.

फोनमधून निघणाऱ्या रेडिएशनपासून वाचवण्यासाठी शेणाचे हे कव्हर सहज कोणीही वापरू शकते. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता, ज्यामध्ये एका व्यक्तीच्या हातात एक बॉक्स सारखी वस्तू दिसत आहे. हे खरं तर तो बॉक्स नसून मोबाईल कव्हर आहे. हे कव्हर त्याने शेणापासून तयार केले आहे. प्रसिद्ध गाय शास्त्रज्ञ शिवदर्शन मलिक यांनी हे अनोखे मोबाईल कव्हर तयार केले आहे. सध्या ते स्वतः या कव्हरची चाचणी घेत आहेत. मलिक यांच्या म्हणण्यानुसार, मोबाईलचा कोणत्याही कव्हरविना वापर केल्यास रेडिएशन हातातून शरीरात जाऊ शकतात, पण शेणाच्या कव्हरने असे होण्याची शक्यता नसते. मात्र, चाचणीच्या निकालानंतरच याबाबत अधिक बोलू इच्छित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गायीच्या शेणापासून मोबाईल कव्हर बनवणारे शिवदर्शन मलिक हे शेण, माती आणि इतर सेंद्रिय गोष्टींचे मिश्रण करून ऑर्गेनिक काँक्रीट बनवण्यासाठीही प्रसिद्ध आहेत. त्यांनी केमिस्ट्रीचे प्रोफेसर म्हणूनही काम केले आहे. त्यांनी यापूर्वी गोक्रेटच्या विटा बनवल्या होत्या, या विटा हीट रेडिएशन थांबवून घरातील वातावरण अनुकूल ठेवू शकतात असा दावा त्यांनी केला आहे. आता त्यांनी हे मोबाईल कव्हर तयार केले आहे, ज्याची चाचणी सुरू आहे.