Viral Video : सोशल मीडियावर शाळेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी विद्यार्थ्यांचे मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी शिक्षकांचे भावूक करणारे व्हिडीओ व्हायरल होतात. शाळेचे हे व्हिडीओ पाहून अनेकदा शाळेचे दिवस आठवतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये निरागस चिमुकल्यांनी त्यांच्या शिक्षिकेचे चित्र काढले आहे. विद्यार्थ्यांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

शाळा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येकाला शाळा, शाळेचे दिवस, शाळेचे शिक्षक आणि मित्र मैत्रीणी कायम आठवतात पण शाळेचे दिवस कधीच परत येत नाही. सध्या असाच हा शाळेतील व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या शालेय जीवनातील गमती जमती आठवतील. या व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षिकेचे काढलेले चित्र पाहून काही लोकांना त्यांचे शाळेतील आवडते शिक्षक आठवतील.

हेही वाचा : आज फिर जीने की तमन्ना हैं.., विश्वास नांगरे पाटलांनी लुटला पोहण्याचा आनंद; सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये शाळेतील एक वर्गखोली दिसेल. वर्गखोलीत शिक्षिका एका खास पोझमध्ये खूर्चीवर बसलेल्या आहेत आणि विद्यार्थी या शिक्षिकेचे चित्र काढताना दिसत आहे. सर्व विद्यार्थी खूप मनापासून चित्र काढत आहे. व्हिडीओच्या शेवटी तुम्हाला विद्यार्थ्यांनी काढलेले चित्र दिसतील. हे चित्र पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. निरागस विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षिकेचे चित्र काढले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायकल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : तुझ्या जिद्दीला सलाम! दोन्ही हात नसणारी तरुणी इतरांच्या हातावर काढतेय सुंदर मेहेंदी, VIDEO एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ranjana_._kumre या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “शेवट नक्की बघा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “शिक्षिकेचे कौतुक करावे तितके कमी. मुलांना असे प्रेरणा देत राहा” तर एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून शाळेचे दिवस आठवले” आणखी एका युजरने लिहिलेय, “क्रिएटिव्ह विद्यार्थी” अनेक युजर्सनी व्हिडीओ पाहून हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.