‘सोशल मीडियाचं जग’ही अप्रतिम आहे. दररोज एकापेक्षा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल सांगता येत नाही. काही लोक त्यांच्या व्हिडीओ आणि फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत. आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहा. एका मुलाला बाईकवर स्टंट करणं किती महागात पडलं ते यातून कळेल. व्हिडीओ पाहिल्यानंतर कदाचित तुम्हीही म्हणाल की सर्व हिरोपंती जीवावर आली.

आतापर्यंत तुम्ही स्टंटचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. अनेकांना स्टंट करण्यातही मजा येते. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहा, एक व्यक्ती बाईकवर कसा स्टंट करत आहे. व्हिडीओची सुरुवात पाहून पुढच्याच क्षणी त्या व्यक्तीसोबत काही वाईट होणार आहे असं वाटतंही नाही. हा व्यक्ती बाईक अगदी आरामात हवेत उचलून एका बाजुने दुसऱ्या बाजुला घेताना दिसून येत आहे. पण काही सेकंदांनंतर समोर येणारी दृश्यं खरोखरच भितीदायक आहे. बाईक हवेत उचलून रस्त्याच्या एका बाजुने दुसऱ्या बाजुला घेताना या व्यक्तीचं बाईकवरील संतुलन बिघडलं आणि थेट रस्त्यावरील एका खांबावर जाऊन आपटला.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नऊ महिन्याच्या बाळाचे ‘हे’ पहिले शब्द ऐकून फक्त पालक नव्हे तर तुम्ही सुद्धा चकित व्हाल

इथे हा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : कतरिना कैफच्या ‘चिकनी चमेली’ गाण्यावर दिल्लीतील तरुणीचा जबरदस्त डान्स

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, “रस्त्यावर सुरक्षित रहा, कुणीही अशी स्टंटबाजी करू नका, कधी कधी अशा दुर्घटना जीव घेऊ शकतात, आणि मग तुमचं कुटुंब ढसाढसा रडेल”. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून या कृत्याबद्दल संतापही व्यक्त होत आहे. त्याचबरोबर काही लोक व्हिडीओचा आनंदही घेत आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : या ड्रामेबाज सापापुढे बडे बडे अभिनेते सुद्धा फिके पडतील, हात लावताच करतोय मेल्याचं ‘नाटक’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा स्टंट व्हिडीओ पाहून काही लोक संतापले आहेत. देवाने तुम्हाला मेंदूही दिला आहे, असे लोक म्हणतात. असे मूर्खपणाचे काम करण्यापूर्वी तुमच्या मेंदूचा वापर करा. त्याचवेळी एका युजरने ‘ह्याला हॉस्पिटलला जाण्यासाठी केलेला जुगाड म्हणतात’ अशी टोमणाही मारला आहे.